Breaking

Wednesday, May 31, 2023

Nagpur News : अभयारण्यातील रिसॉर्टमध्ये अश्लील नृत्य, ६ मुलींसह १८ अटकेत; डॉक्टर, उद्योगपतीही होते https://ift.tt/Fd5GeuB

नागपूर : उमरेड पवनी कऱ्हाडंला अभयारण्यातील एका रिसॉर्टमध्ये अश्‍लील नृत्य केल्याची घटना समोर आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मंगळवारी टाकलेल्या छाप्यानंतर ही बाब उघडकीस आली. यादरम्यान एलसीबीने सहा मुलींसह १८ जणांना अटक केली आहे. या लोकांमध्ये शहरातील अनेक प्रसिद्ध डॉक्टर आणि उद्योगपतींचा समावेश आहे. त्याचवेळी त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, रिपोर्टमध्ये मुली अश्लील डान्स करत आहेत. तिथे त्याच्या आजूबाजूला बसलेले लोक खुर्च्यांवर बसून दारू पीत आहेत. यादरम्यान लोक मुलींवर पैसेही फेकत आहेत. उमरेड तालुक्यातील तिरखुरा येथील टायगर पॅराडाईज रिसॉर्टमध्ये हे सुरू होते. रिसॉर्टच्या एका रॉयल हॉलमध्ये अश्लील नृत्य सुरू होते. दरम्यान, एलसीबीच्या पथकाने छापा टाकला. छाप्याची बातमी मिळताच रिसॉर्टमध्ये एकच खळबळ उडाली. घाईघाईत सगळे इकडे तिकडे धावू लागले. रात्रीपासून सुरू झालेली एलसीबीची ही कारवाई सकाळपर्यंत सुरू होती.यावेळी एलसीबीच्या पथकाने सहा मुलींसह १८ जणांना ताब्यात घेतले आहे. या लोकांमध्ये नागपूर, मौदा येथील अनेक नामवंत डॉक्टर आणि व्यावसायिकांचा समावेश आहे. मात्र, याप्रकरणी पोलीस कोणतीही माहिती देण्यास व बोलण्यास नकार देत आहेत. या आधीही ब्राह्मणी येथे 'न्यूड डान्स'चा विडिओ व्हायरल झाला होता या आधी ही उमरेड तालुक्यातील ब्राह्मणी येथे 'न्यूड डान्स' प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली होती. उमरेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ब्राह्मणी येथे ‘नग्न नृत्य’ केल्याप्रकरणी विशेष तपास पथकाने (एसआयटी) १० जणांवर कारवाई केली होती. ब्राह्मणी येथे शंकर पाटाचे आयोजन केल्यानंतर नागपूरच्या अ‍ॅलेक्स डान्स शोच्या महिला कलाकारांनी मंडपात अश्लील नृत्य केले होते ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर पोलिसांनी कारवाई केली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/IPJm3fk

No comments:

Post a Comment