Breaking

Friday, June 16, 2023

Ayodhya Poul : अयधय पळ यचयवर शईफक महलकडन ठणयतल कळवयत मरहण ठकर गटच करवईच मगण https://ift.tt/Sd1xmh8

ठाणे : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात पुन्हा एकदा ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यावर हल्ला करण्यात आल्याची घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली आहे. कळव्यातील मनीषा नगर येथे आयोजित पुण्यश्लोक आहिल्याबई होळकर जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शिवसेना उद्धव बाळासाबे ठाकरे पक्षाच्या सोशल मीडियाच्या राज्य समन्वयक यांना देखील बोलावण्यात आले होते. मात्र, यावेळी अयोध्या पौळवर यांच्या शाईफेक करत मारहाण करण्यात आली आहे. मात्र, तो ठाकरे गटाचा कार्यक्रम नसून ट्रॅप रचण्यात आला असल्याचा आरोप यावेळी पौळ यांनी केला. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणी दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. कळव्यातील मनीषा नगर जयभीम नगर येथे अहिल्या देवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ठाकरे गटाकडून कार्यक्रम ठेवण्यात आल्याचं दाखवण्यात आलं होता. या कार्यक्रमाला ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे आणि खा. राजन विचारे ठाणे जिल्हाध्यक्ष केदार दिघे येणार असल्याचे भासून पोळ यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, अशाप्रकारे फसवून पोळ यांना कार्यक्रमात बोलावलं असल्याचे महिला पदाधिकारी यांनी सांगितले. दरम्यान यावेळी सर्व महापुरुष यांच्या फोटोला हार घालत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला शेवटी हार का घातला असे म्हणून स्थानिक महिलांनी पोळ यांच्यावर प्रथम शाई फेकली आणि नंतर मारहाण केली. यावेळी ठाकरे गटाच्या कोणताही पदाधिकारी या ठिकाणी नसल्याचे लक्षात आल्यानंतर पोळ यांनी त्या ठिकाणावरून थेट पोलीस ठाणे गाठले.कळवा पोलीस स्टेशन मध्ये अयोध्या पोळ यांनी तक्रार नोंदवली असून पोलीस स्टेशन बाहेर जमलेल्या शिंदे गटाच्या महिला तसेच पुरुष कार्यकर्त्याना पोलिसांनी पांगवले. दरम्यान हा कार्यक्रम ठाकरे गटाचा कार्यक्रम नसून हा ट्रॅप रचण्यात आला असल्याचे स्थानिक ठाकरे गटातील महिला पदाधिकारी यांनी सांगितले.शिवसैनिक अयोध्या पौळ या भगिनीला ठाणे-कळव्यात झालेली मारहाण अतिशय निंदनीय आहे. हा भेकडपणा महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा आलेख खाली आणणारा आहे. या हल्ल्यातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची हिंमत आता पोलिसांनी दाखवावी, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/6JBtYhm

No comments:

Post a Comment