बुलढाणा : नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या खासगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर बसला आग लागली. हा अपघात बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील पिंपळखुटा मार्गावर झाला आहे. हा अपघात समृद्धी महामार्गावर झाला. या बसमध्ये एकूण ३३ प्रवासी प्रवास करत होते. या बसमधील २५ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघातग्रस्त बस ही विदर्भ ट्रॅव्हल्सची असल्याची माहिती समोर आली आहे. ही बस नागपूरहून पुण्याकडे निघाली होती. या बसचा अपघात पहिल्यांदा बस खांबाला धडकल्यानंतर पलटी झाली आणि आग लागली. ही बस एका बाजूला कोसळली त्यामुळं दरवाजा उघडण्याचा मार्ग बंद झाला होता.समृद्धीवर पुन्हा भीषण अपघात विदर्भ ट्रॅव्हलच्या बसला अपघात झाला आणि २५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटा गावाजवळ समृद्धी मार्गावर रात्री एक ते दीडच्या दरम्यान विदर्भ ट्रॅव्हल्स ला अपघात झाला. ही बस एका खांबाला धडकली आणि त्यानंतर बस पलटी झाली. बस डाव्या बाजूला पलटी झाल्यानं दार बंद झालं आणि बाहेर पडण अशक्य झालं. यामध्ये प्राथमिक माहितीनुसार २५जणांचा मृत्यू झाला आहे. बस मध्ये एकूण ३३ जण प्रवास करत होते. नागपूरहून पुण्याला ही खाजगी बस प्रवास करत होती. बुलढाण्यातील सिंखेडराजा जवळ परिसरात या बसला अपघात झाला. बसमधील आठ प्रवासी सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे. पिंपळखुटा गावाजवळ समृद्धी मार्गावर हा अपघात झाला.बस दुभाजकाला धडकली त्यावेळी समोरचा एक्सेल तुटला होता. समोरची चाक बस पासून वेगळी झाली होती. त्यानंतर आग लागली. या घटनेत ३३ जणांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर काही प्रवाशांनी काचा फोडून बाहेर येण्याचा प्रयत्न केला. काचा फोडून बाहेर आलेल्या प्रवाशांचा जीव वाचला आहे. बस अपघातग्रस्त झाल्यानंतर बसमधील काही तरुणांनी काचा फोडल्या आणि ते बाहेर आले. त्यांनी काही प्रवाशांना बाहेर काढले. हा अपघात १.२६ मिनिटांनी अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. या बसमध्ये नागपूर,वर्धा आणि यवतमाळ मधील प्रवासी होते.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/uS0TJpN
No comments:
Post a Comment