Breaking

Friday, June 30, 2023

ददच सरकर क पडल? सयकत समलनत कदरय मतर रवसहब दनवच शरद पवरन सवल https://ift.tt/1vH5rgJ

म. टा. विशेष प्रतिनीधी, नाशिक / सिडको : ‘राज्यातील सत्तेसाठी आम्ही महाविकास आघाडी सरकार पाडले, असे शरद पवार म्हणतात . पण, पवारांनी वसंतदादांचे सरकार का पाडले? तेव्हा तेदेखील सरकारमध्ये होते,’ असा सवाल केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी येथे उपस्थित केला.मी स्वतः २८ वर्षे आमदार, खासदार होतो, तेव्हा सत्तेत नव्हतो . त्यामुळे आम्ही खऱ्या शिवसेनासोबत गेलो आणि सरकार स्थापन केले, असा दावाही दानवे यांनी केला. देशभरात कुठेही जाता येते. महाराष्ट्रातील लोक सुज्ञ असून, ‘बीआरएस’ला त्यांचा पक्ष वाढवायचा अधिकार आहे. त्यामुळे पंकजा मुंडेच नव्हे, तर ‘बीआरएस’ मलाही मुख्यमंत्रिपदाची ऑफर देऊ शकतो, असा खुलासाही दानवेंनी ‘बीआरएस’च्या दाव्यावर केला. सन २०१४ ते २०२३ या नऊ वर्षांच्या कालावधीत भाजप सरकारने सत्तेत आल्यानंतर जनतेसाठी केलेल्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी संयुक्त मोर्चा संमेलन, तसेच उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना दानवे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीकास्र सोडले. महाविकास आघाडी सरकारमुळे मराठा आरक्षण गेल्याचा पंकजा मुंडेंचा दावा आरोप बरोबर आहे, असे सांगत हायकोर्टानेही ते मान्य केले आहे. महाविकास आघाडीच्या सरकारने वकिलांची फौज उभी केली नव्हती. त्यामुळे आरक्षण गेल्याच्या पंकजाच्या आरोपांचे दानवेंनी समर्थन केले आहे. समान नागरी कायदा असणे हे निवडणुकीच कार्ड नाही, असा दावाही त्यांनी केला. एक हजार रुपयांत रेल्वे स्टेशनवर राहायची व्यवस्था रेल्वे मंत्रालय करीत असून, नाशिकचाही त्यात समावेश केला जाईल, असे दानवेंनी यावेळी सांगितले.भाजपची कामे जनतेपर्यंत पोहोचवाआगामी निवडणुका लक्षात घेत गेल्या नऊ वर्षांत भाजप सरकारने सत्तेत आल्यावर केलेली कामे, विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन दानवे यांनी केले. मोदी@९ जनंसपर्क अभियानाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. पर्यटन, तसेच कौशल्य रोजगारमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह व्यासपीठावर आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे, राहुल ढिकले, गिरीश पालवे, लक्ष्मण सावजी उपस्थित होते. मंत्री लोढा यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांचे सर्वांत जास्त लक्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आहे. कदाचित मोदी पंतप्रधान नसते, तर भारताची परिस्थिती पाकिस्तान-श्रीलंकेसारखी व्हायला वेळ लागली नसती. उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांचा अपमान केला होता, यामुळेच भाजप-शिवसेना सरकार स्थापन करून फडणवीसांनी बदला घेतला. नाशिक शहर हे धार्मिक, तसेच आध्यात्मिक आहे. यासाठी येत्या काही दिवसांत नाशिक शहरात नाशिक फेस्टिव्हल होणार असल्याचेही लोढा यांनी सांगितले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/52Rhoj7

No comments:

Post a Comment