सोलापूर : आषाढी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा आज, गुरुवारी लाखो वैष्णवांच्या उपस्थितीत पंढरीत पार पडत आहे. यात्रेच्या पूर्वसंध्येला पंढरीत सुमारे १० लाखांहून अधिक भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली आहे. श्री विठुरायासह रुक्मिणीमातेचे पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी दर्शनरांगेतही दोन लाखांवर भाविक उभे आहेत. ही दर्शनरांग पत्राशेडच्या बाहेर गोपाळपूर रस्त्यावर गेली आहे. पाऊस, वारा, उन्हाचा चटका बसू नये म्हणून दर्शनरांगेत शेडनेटची सावली तयार करण्यात आली आहे. त्यामुळे भाविक भक्तीत तल्लीन असल्याचे चित्र दिसून येते.आषाढी एकादशीला आलेले भाविक चंद्रभागा स्नान करण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे एकादशी सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांनी चंद्रभागा वाळवंट फुलले आहे. भाविक स्नानाचा आनंद घेत आहेत. श्रींचे दर्शन घेण्यासाठी भाविक रांगेत उभे आहेत. दर्शन रांग पत्राशेडमध्ये पोहोचलेली आहे. या दर्शनरांगेत दोन लाखांहून अधिक भाविक दाखल झालेले आहेत. मंदिर समितीच्या वतीने वॉटरप्रूफ दर्शनरांग उभारण्यात आली आहे. पत्राशेड येथे कायमस्वरूपी चार, तर तात्पुरते सहा असे १० दर्शनशेड उभारण्यात आलेले आहेत. तसेच भाविकांसाठी खिचडी, चहा, पाणी, ताक, मठ्ठा आदींची मोफत व्यवस्था करण्यात आली असल्याचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगीतले.६५ एकरात भक्तीचा मळाभाविकांची वारी सुरक्षित पार पडावी म्हणून आठ हजार पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. तसेच मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट, दर्शनरांग, ६५ एकर व शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी बसवलेल्या ३०० सीसीटीव्हींची करडी नजर आहे.दर्शनरांगेत गर्दी वाढलीआषाढ वारी मोठ्या प्रमाणात भरू लागली आहे. दर्शनरांगेत गर्दी होऊ लागली असून रांगेत, दोन लाखांपेक्षा जास्त भाविक आहेत. माऊली, तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसमवेत सुमारे सात लाख भाविक आहेत.पालखी सोहळे पंढरीतबुधवारी दशमी दिवशी सकाळी वाखरीतून पालख्यांनी पंढरीकडे प्रस्थान ठेवले. तत्पूर्वी पंढरीत दाखल झालेल्या मानाच्या पालख्या वाखरी येथे गेल्या आणि तेथे संत भेटीचा कार्यक्रम झाला. सोमवारी संत मुक्ताबाईंची पालखी पंढरीत दाखल झाली. मंगळवारी शेगावच्या श्री संत गजानन महाराजांची पालखी दाखल झाली. संत एकनाथ महाराजांचा पालखी सोहळासुद्धा विठुरायाच्या नगरीत पोहोचला आहे. यांसह अनेक लहान मोठ्या दिंड्या पंढरीत दाखल झाल्या आहेत. वाखरीचा मुक्काम संपवून बुधवारी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्यासह अनेक संतांच्या पालखी आणि दिंड्यांनी सायंकाळी पंढरीत प्रवेश केला. यावेळी मोठ्या भक्तिमय वातावरणात पालखी सोहळ्याचे पंढरपूरकरांनी स्वागत केले.मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज शासकीय महापूजाराज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी सायंकाळी सोलापुरात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्या सोलापुरातील संपर्क कार्यालयाला भेट दिली. त्यानंतर ते पंढरपुरात दाखल झाले. गुरुवारी पहाटे आषाढी एकादशी दिवशी सपत्नीक ते श्री विठ्ठल आणि रखुमाईची महापूजा करणार आहेत. त्यांच्यासमवेत मंत्रिमंडळातील काही मंत्रीसुद्धा उपस्थित राहणार आहेत. मंदिर समितीने याची तयारी केली असल्याचे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/zqPMyD5
No comments:
Post a Comment