मुंबई : गौतम अदानी यांच्या नेतृत्वातील अदानी समूहाच्या शेअर्सना पुन्हा एकदा बूस्टर मिळाला आहे. GQG पार्टनर्सने चार महिन्यांत तिसऱ्यांदा अदानी समूहाच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली असून यूएसस्थित GQG पार्टनर्सने अदानी समूहाचे एक अब्ज डॉलर्सचे शेअर्स खरेदी केले आहेत. अमेरिकन कंपनी जीक्यूजी पार्टनर्स (GQG Partners), IHC ग्रुप आणि इतर गुंतवणूकदारांनी बुधवारी अदानी समूहाच्या शेअर्समध्ये १ अब्ज डाॅलर (८.२ हजार कोटी रुपये) गुंतवणूक केली असून या गुंतवणूकदारांकडून अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी ग्रीन एनर्जीचे अतिरिक्त भागभांडवल ब्लॉक डीलद्वारे विकत घेण्यात आले आहे.तिसऱ्यांदा शेअर्स खरेदीइकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार GQG पार्टनर्ससह इतर काही गुंतवणूकदारांनी एक अब्ज डॉलर्सच्या ब्लॉक डीलमध्ये अदानी ग्रुपचे शेअर्स खरेदी केले आहेत. चार महिन्यांत सीक्यूजी पार्टनर्सने अदानी समूहात गुंतवणूक करण्याची ही तिसरी वेळ आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला सीक्यूजीने अदानी ग्रुपच्या चार कंपन्यांमध्ये (अदानी पोर्ट्स, ग्रीन एनर्जी, ट्रान्समिशन आणि एंटरप्रायजेस) १५ हजार ४४६ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. मे मध्ये सीक्यूजीचे संस्थापक राजीव जैन यांनी सांगितले की त्यांच्या कंपनीने गौतम अदानी समूहातील आपला हिस्सा १० टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. अहवालानुसार, मे महिन्यात अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी ट्रान्समिशनने २१ हजार कोटी रुपये उभारण्याची घोषणा केली होती.गुंतवणुकीनंतरही शेअर्स घसरलागुंतवणुकीनंतरही बुधवारी अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली. दिवसभर व्यवहार केल्यानंतर, अदानी ग्रीन एनर्जी ०.८७% घसरून ९६० रुपयांवर बंद झाली. तथापि, इतर सर्व समभागांमध्ये वाढ दिसून आली. अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स ५.११% वाढून २,४१३ रुपयांवर बंद झाले. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार अदानी एंटरप्रायझेसच्या स्टॉकमध्ये २३०० रुपयांच्या किमतीत ब्लॉक डील दिसून आली, तर अदानी ग्रीनमध्ये ९२० रुपयांना डील झाली. GQG पार्टनर्सच्या गुंतवणुकीनंतर अदानी एंटरप्रायझेस ३.९९% वाढीसह २३७५ रुपयांवर आणि अदानी पोर्ट्स ३.३७% वाढीसह ७४४ रुपयांवर व्यवहार करत आहे.हिंडेनबर्गचे आरोपहिंडेनबर्ग रिसर्चने २४ जानेवारी रोजी अदानी समूहाबाबत एक अहवाल प्रकाशित केला. अहवालात मनी लाँड्रिंगपासून शेअर्समध्ये फेरफार करण्यापर्यंतचे आरोप समूहावरर करण्यात आले होते. यानंतर समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. अदानी ग्रुपची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचा शेअर जवळपास ३५०० रुपयांवरून १००० रुपयांपर्यंत घसरला.अमेरिकेतील शॉर्ट सेलर कंपनीने अदानी समूहावर शेअर्समध्ये छेडछाड केल्याचा आरोप केला होता, जे अदानी समूहाने फेटाळून लावले. परंतु यामुळे समुहाचे शेअर्समध्ये एक महिन्याहून अधिक काळ प्रचंड घसरण झाली. मात्र, अलीकडे यात काही रिकव्हरी दिसून आली असली तरी अदानी समूहाच्या दहा सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप १० लाख कोटी रुपये राहिले आहे, जे हिंडेनबर्ग अहवालापूर्वीच्या तुलनेत ४८% कमी आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/kovXL07
No comments:
Post a Comment