Breaking

Monday, June 12, 2023

धक्कादायक! मुलगा घरातून गायब, रात्री उशिरा आला, वडील संतापले; मुलाला नग्न करून रेल्वे रुळावर बसवले https://ift.tt/C40qAvD

हरदोई (उत्तर प्रदेश) : घरातून बेपत्ता असताना एका बापाने आपल्या मुलाला करून प्लास्टिकच्या दोरीने बांधले आणि त्याला रेल्वे रुळावर बसवले आणि स्वत: दूर जाऊन बसले. यादरम्यान समोरून एक ट्रेन वेगाने येत होती. तेवढ्यात मुलाची बहीण तिथे आली आणि तिच्या वडिलांना तिने समजवले आणि तिने लहान भावाला रुळावरून हटवले. या घटनेचा कोणीतरी व्हिडिओ बनवून व्हायरल केला. व्हायरल व्हिडिओची दखल घेत जीआरपीने तपास सुरू केला आहे.सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ हरदोई रेल्वे स्थानकाजवळील सीतापूर ओव्हरब्रिजच्या खालील असल्याचे सांगण्यात येत आहे. ओव्हर ब्रिजजवळ राहणाऱ्या एका व्यक्तीने या निरागस मुलाचे हातपाय प्लास्टिकच्या दोरीने बांधून त्याला रेल्वे रुळाच्या मध्यभागी बसवले. उशिरा घरी आलाया घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हा रविवारी सकाळी घरातून निघून गेला होता आणि रात्री उशिरापर्यंत तो घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. मात्र कोणताही सुगावा लागला नाही. रात्री अकराच्या सुमारास मुलगा स्वतःहून घरी पोहोचला. संतापलेल्या वडिलांनी त्याला रेल्वे रुळावर नेले, मुलाचे कपडे काढायला लावले आणि नंतर त्याला प्लास्टिकच्या दोरीने बांधून रेल्वे रुळावर बसवले आणि स्वतः रुळाच्या बाजूला बसले. समोरून ट्रेन येत होती, बहिणीने वाचवलेव्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे ऐकू येत आहे की एक मुलगी, (मुलाची बहीण), तिथे येते आणि अपघात झाला तर आपण काय करायचं असं सांगून वडिलांना शांत करण्याचा प्रयत्न करते. यानंतर तिचे सांगतात की मी इथे बसलो आहे आणि माझे लक्ष आहे. तेवढ्यात समोरून ट्रेन येताना दिसते आणि मुलाची बहीण पुन्हा सांगते की समोरून ट्रेन येतेय, उचला त्याला. त्यानंतर वडील त्याला उचलतात आणि घेऊन जातात आणि काही अंतरावर बसवून ते बाजूला जाऊन बसतात. लोकांनी व्हिडिओ बनवले पण मदत केली नाहीया संपूर्ण घटनेदरम्यान तेथे खूप लोक जमा झाले आणि काही लोकांनी त्याचा व्हिडिओही बनवला. आश्‍चर्याची बाब म्हणजे मुलाला वाचवण्यासाठी कोणीही पुढे आले नाही किंवा मुलाच्या वडिलांना समजवण्याचा प्रयत्नही केला नाही. लोकांनी व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केले. व्हायरल झालेल्या व्हिडिओची सरकारी रेल्वे पोलिसांनी दखल घेतली आहे. जीआरपी स्टेशन प्रभारी अरविंद कुमार यांनी या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर कारवाईचे आदेश दिले आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/7iF3ZMf

No comments:

Post a Comment