Breaking

Thursday, June 22, 2023

भरतच मदर परणयवर तवन बडमटन सपरधचय उपतयपरव फरत दमखत परवश https://ift.tt/mKMTdtA

तैपई : शिस्त, संयम आणि नेटाने सराव अशा त्रिसूत्रीसह वाटचाल करणारा भारताचा बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉयने गुरुवारी तैवान ओपन सुपर ३०० स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. या स्पर्धेत आता भारताची मदार फक्त प्रणॉयवर असेल; कारण पुरुष आणि महिला एकेरी, मिश्र दुहेरी अशा इतर विभागांतील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. जागतिक रँकिंगमध्ये नवव्या क्रमांकावर असलेल्या प्रणॉयने इंडोनेशियाच्या टॉमी सुगियार्तोवर २१-९, २१-१७ अशी सहज मात केली. पुढील फेरीत प्रणॉयचा सामना हाँगकाँगचा पाचवा सीडेड एनजी का लाँग अंगुस यांच्याविरुद्ध होईल. सुगियार्तो हा पूर्वी जागतिक रँकिंगमध्ये तिसऱ्या क्रमांकावर होता, मात्र अलीकडे कामगिरीअभावी त्याची रँकिंगमध्ये ९५व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. प्रतिस्पर्ध्याच्या खेळाचे लवकरात लवकर आकलन करायचे अन् डावपेचांनुसार आगेकूच करायची, हे सूत्र प्रणॉयने गुरुवारीही चोख वापरले. यामुळेच पहिल्या गेममध्ये १-१ अशा बरोबरीनंतर त्याने सुगियार्तोवर ८-१ अशी खणखणीत आघाडी घेतली होती. हाच झपाटा कायम राखत प्रणॉने पहिला गेम २१-९ असा खिशात टाकत प्रतिस्पर्धी सुगियार्तोवर दडपण आणण्यात यश मिळवले. दुसऱ्या सेटच्या सुरुवातीला चित्र थोडे वेगळे दिसले. सुगियार्तोने प्रणॉयवर प्रतिहल्ला करत आघाडी घ्यायला सुरुवात केली. त्याला सूर गवसतो आहे की काय, असेही वाटत होते. या दुसऱ्या गेममध्ये एका क्षणी भारताचा शिलेदार प्रणॉय ३-१० असा पिछाडीवरही पडला होता. प्रणॉयने मात्र सहजासहजी हार मानली नाही. त्याने सुगियार्तोच्या प्रतिहल्ल्यावर तोडगा शोधला. भारताच्या ३० वर्षीय बॅडमिंटनपटूने आपली पिछाडी कमी करत १५-१५ अशी बरोबरी साधली. ही बरोबरी अगदी १७-१७ पर्यंत कायम राहिली. अन् खेळाचा वेग वाढवत, अचूक चालींसह प्रणॉयने पुढील सलग चार गुण जिंकत दुसरा गेम आणि सामना खिशात टाकला. अन्य खेळाडूंची हारत्याआधी मिश्र दुहेरीत रोहन कपूर-सिक्की रेड्डी यांना तैवनाच्याच चियू सियांग चेह आणि लिन झियाओ मिन यांच्याविरुद्ध १३-२१, १८-२१ अशा पराभवाचा सामना करावा लागला. महिला एकेरीत तान्या हेमंतचा अव्वल सीडेड तैइ झ्यू यिंगविरुद्ध निभाव लागला नाही. ऑलिम्पिक आणि जागतिक स्पर्धेत उपविजेती ठरलेल्या तैइने तान्याला २-११, २१-६ असे हरवले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/GIVXqLd

No comments:

Post a Comment