Breaking

Wednesday, June 21, 2023

सडकचय मटर मरगल हरव कदल; य मरगवर लवकरच सडकच मटर धवणर https://ift.tt/NGoMkhB

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : सिडकोच्या प्रकल्पातील मार्ग क्र.१ ला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस) यांच्याकडून सीएमआरएस प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. त्यामुळे बहुप्रतीक्षित नवी मुंबई मेट्रो सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील बेलापूर ते पेंधरदरम्यान प्रवासी वाहतूक सुरू होणार आहे.सिडकोतर्फे नवी मुंबई मेट्रो प्रकल्पांतर्गत, नवी मुंबईतील सार्वजनिक परिवहन व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी एकूण चार उन्नत मेट्रो मार्ग विकसित करण्यात येत आहेत. त्यापैकी बेलापूर ते पेंधर या मार्ग क्र.१ च्या अंमलबजावणीचे काम सर्वप्रथम हाती घेण्यात आले आहे. सिडकोतर्फे मार्ग क्र. १ च्या अंमलबजावणीसाठी अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून महा मेट्रोची नियुक्ती करण्यात आली आहे. सिडकोच्या मेट्रो मार्ग क्र.१ च्या अंमलबजावणीसाठी सिडकोला आयसीआयसीआय बँकेकडून ५०० कोटी रुपयांचा वित्तपुरवठा मिळाला आहे.यापूर्वी ऑक्टोबर २०२१ मध्ये मार्ग क्र. १ वरील पेंधर ते सेंट्रल पार्क या पाच स्थानकांदरम्यान प्रवासी वाहतूक सुरू करण्याकरिता सीएमआरएस प्रमाणपत्र प्राप्त झाले होते. आता मार्ग क्र.१ वरील पेंधर ते बेलापूर स्थानकांदरम्यान प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी सीएमआरएस प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. यामुळे लवकरच संपूर्ण मार्ग क्र.१ प्रवासी वाहतुकीकरिता कार्यान्वित होणार आहे. सिडकोने नवी मुंबई मेट्रो लाईन १ च्या यशस्वी परिचालनाची सर्व व्यवस्था केली असून महामेट्रोची ऑपरेटर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याचबरोबर मेट्रो प्रवासी दर निश्चित करून कर्मचारी भरती देखील करण्यात आली आहे. सीएमआरएस प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांनी मार्ग क्र.१ वरील मेट्रो स्थानकांना भेट दिली.‘लवकरच प्रवासी वाहतूक’नवी मुंबई मेट्रोच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा सर झाला आहे. सीएमआरएस प्रमाणपत्र प्राप्त झाल्यामुळे नवी मुंबईकरांकरिता बेलापूर ते पेंधर मार्गिकेवर लवकरच मेट्रो सेवा सुरू होणार आहे. अनेक अडीअडचणींवर मात करून बहुप्रतीक्षित अशी नवी मुंबई मेट्रो सेवा लवकरच सुरू होणार असल्याची माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांनी दिली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/niAV58Y

No comments:

Post a Comment