म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : सर्वसामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळातर्फे (महा हाऊसिंग) ठाणे जिल्ह्यामधील दिवा, मुंब्रा आणि टिटवाळा भागात परवडणारी सुमारे १७ हजार घरे बांधली जाणार आहेत. आवश्यक सुविधांनी युक्त अशा या घरांबाबतची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. केंद्र सरकारकडून मान्यता मिळाल्यानंतर प्रकल्पास प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात येते. सुमारे दीड वर्षाच्या कलावधीत ही घरे उभारली जाणार आहेत.राज्य सरकारने डिसेंबर २०१८मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतील मोठ्या वसाहतींच्या प्रकल्पांसाठी ‘महाहाऊसिंग’ची निर्मिती केली आहे. त्यामार्फत ठाणे, पुणे, सातारा, सोलापूर, अमरावती, नागपूर आदी जिल्ह्यांत ४७ हजार ३४२ घरांसाठीच्या प्रकल्पांची प्रक्रिया सुरू झाली आहे. ठाण्यातीत दिवा येथे नऊ हजार ४७९ घरे, आणि टिटवाळा येथे सात हजार ५२६ घरे असतील. या योजनेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष दिले असून, ती खासगी सहभागातून पूर्णत्वास येणार आहे. त्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण झाली की लागलीच बांधकामास सुरुवात होणार आहे. ‘महाहाऊसिंग’तर्फे राज्यातील अन्य शहरांतही गृहप्रकल्प राबविण्याची योजना आहे. त्यात सोलापूरमधील मजारवाडी-३,७१०, कसबा-६,९६४, सरकारी भूखंड-३१५, नागपूरमधील कामटे-५,४८२, वाघधरा-२,३५८, वांगडोंगरी-१,९७० आणि साताऱ्यातील खंडाळ्यात ९,४७९ घरांचा समावेश आहे.
दिव्यात १८ ते ३२ लाखांत घर
‘महाहाऊसिंग’ योजनेंतर्गत दिवा शहरात अत्यल्प उत्पन्न गटासाठी ३०० चौरस फुटांची सहा हजार घरे असून, त्यांची किंमत सुमारे १८ लाख आहे. अल्प गटासाठी ५०० चौरस फुटांची साडेचार हजार घरे असतील. त्यांची किंमत ३२ लाख असणार आहे. या संकुलात शाळा, रुग्णालय, क्लब हाऊस आदींचा समावेश आहे. हा प्रकल्प मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असल्याचे ‘महाहाऊसिंग’चे व्यवस्थापकीय संचालक अजित कवडे यांनी सांगितले.from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/hr785FV
No comments:
Post a Comment