Breaking

Sunday, June 25, 2023

रववर ठरल कळदवस भषण अपघतत जणच मतय कदम कझ कटबवर शककळ https://ift.tt/oXK71zH

दापोली, रत्नागिरी : जिल्ह्यात दापोली येथे रविवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झालेल्यांची संख्या आता वाढली आहे. दापोलीसाठी हा रविवार काळदिवस ठरला आहे. या अपघातातील मृतांची संख्या आठवर पोहोचली आहे. अपघातात एकूण १४ जखमी झाले आहेत.अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये मॅजिक प्रवासी रिक्षा चालकाचाही समावेश आहे. या भीषण अपघातात अडखळ येथील कदम व काझी या कुटुंबातील प्रत्येकी दोन जणांचा याप्रमाणे एकूण चार जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये कदम कुटुंबातील वडील आणि लेकीचा तर काझी कुटुंबातील मायलेकींचा मृत्यू झाला. पाजपंढरी येथील चौगुले कुटुंबामधील पत्नीचा मृत्यू झाला आहे.भीषण अपघातामुळे तालुक्यावर शोककाळा पसरली आहे. सालदुरे येथे माल खाली करून दापोलीच्या दिशेने भरधाव येणाऱ्या ट्रकने हर्णैकडे जाणाऱ्या मॅजिक प्रवासी रिक्षाला जोरात धडक दिली. यात मॅजिक प्रवासी रिक्षेतील आठ जणांचा मृत्यू झाला आहे. ही धडक इतकी भीषण होती की मॅजिक रिक्षा एका डोंगराच्या कपारीत अक्षरशः चेपली गेल्याने आणि या अपघाताची भीषणता वाढली. या भीषण अपघातात प्रकरणी ट्रक चालक संशयित आरोपी फैज रहीस खान (मूळ राहणार यूपी ) याच्यावर दापोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आणि ट्रक चालकाला अटकही केली आहे. भीषण अपघातात सुरुवातीला पाच जणांचा मृत्यू झाला होता. तर तीन जणांचा रात्री उशिरा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात हर्णै बाजारपेठ येथील प्रवासी मॅजिक चालक अनिल उर्फ बॉबी सारंग याचाही जागीच मृत्यू झाला. या अपघातातील आणखी एक महिला अत्यवस्थ असल्याची माहिती मिळत असून तिला मुंबई येथे हलवण्यात आलं आहे. या आठ जणांमध्ये दोन चिमुकल्यांचाही समावेश आहे. दापोली तालुक्यात राज्यमार्गावर असलेल्या आसूद जोशी आळी येथे हा भीषण अपघात झाला. रविवारी दुपारी ३.३० सुमारास अपघात झाला. मृतांमध्ये दोन चिमुकल्यांचाही समावेशमरियम गौफिक काझी (वय ६ वर्षे), स्वरा संदेश कदम (वय ८ वर्षे), संदेश कदम (वय ५५ वर्षे) आणि फराह तौफिक काझी (वय २७ वर्षे) सर्व राहणार अडखळ, अनिल उर्फ बॉबी सारंग (वय ४५ वर्षे रा. हर्णै चालक) अशी मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. या अपघात रात्री उशीरा आणखी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मिरा महेश बोरकर (वय २२ वर्षे) पाडले, वंदना चोगले (वय ३८ वर्षे) पाजपंढरी दापोली येथील भागवत हॉस्पिटलमध्ये उपचार दरम्यान मृत्यू झाला शरय्या शिरगावकर राहणार अडखळ डेरवण येथील हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे. या अपघातातील जखमींमध्ये पुढील जणांचा समावेश आहे. यातील काहींना मुंबई येथे हलविण्यात आले. काहींवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विनायक हशा चौगुले- ४५ पाजपंढरी, श्रद्धा संदेश कदम- १४ अडखळ, सपना संदेश कदम- ३४ अडखळ, भूमी सावंत-१७ हर्णे (मुंबई ट्रान्सफर), मुग्धा सावंत-१४ हर्णे (मुंबई ट्रान्सफर), ज्योती चोगले- ०९ पाजपंढरी या अपघातानंतर तातडीने दापोली उपजिल्हारुग्णालयातील काही डॉक्टर व परिचारिका रविवारची सुट्टी असतानाही रुग्णांच्या मदतीला धावून आल्या. दापोली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश भागवत, डॉ. वैष्णवी भावे, डॉ. नागेश, डॉ. प्रदिप बनसोडे, लँब टेक्निशियन गिते, एक्सरे टेक्निशियन हेमंत नाईक व मयुर पारधे, घाग (परिसेविका), जाधव (परिसेविका), हांडे, संपदा वंडकर, गायत्री भाटकर, दिपिका नांदगांवकर, अर्चना वसावे, निकिता घुगरे, आदी अधिपरिचारिका तसेच कांबळे, धोत्रे, वाघवे, चाळके, तेवरे आदी उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी आणि रामराजे नर्सिंग काँलेजचे विद्यार्थीनी जखमींवर उपचार करण्यास मदत केली. अपघाताचं वृत्त कळताच आमदार योगेश कदम यांनीही तातडीने दापोली येथे रुग्णालयात धाव घेतली. गंभीर जखमींवर तातडीने उपचार करण्यासाठी तात्काळ सूचना दिल्या. गंभीर जखमींना मुंबई येथे नेण्यात आले. शिवसेनेचा आरोग्य विभाग सांभाळणारे मंगेश चिवटे यांनाही संपर्क करण्यात आला.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Ciey0o5

No comments:

Post a Comment