जळगाव : रावेर तालुक्यातील वडगाव येथील महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या तरुणीने शहरानजीकच्या एका शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी समोर आली. शितल मुकेश वाघोदे (वय १९) असे मृत तरुणीचे नाव आहे. तरुणीच्या आत्महत्येमागचे कारण समोर आलेले नाही.रावेर तालुक्यातील वडगाव येथील महाविद्यालयीन शिक्षण घेणारी शितल मुकेश वाघोदे (वय १९) ही तरुणी बुधवारी २८ जून रोजी रावेरला कॉलेजला जात असल्याचे सांगून घरातून गेली होती. त्यानंतर पुन्हा घरीच परत आली नाही. रात्री उशीरापर्यंत ती घरी न आल्याने तिच्या कुटुंबीयांसह नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, ती मिळून आली नाही. यादरम्यान रावेर तालुक्यातील अजंदा रस्त्याने एका शेतात शेतमजूरीचं काम करणाऱ्या महिलांना त्यांच्या शेतात असलेल्या विहिरीजवळ शाळेची बॅग आणि चप्पल आढळून आली. मात्र विहिरीजवळ कुणीही आढळून आले नाही. विहिरीजवळ आढळून आलेली बॅग ही कुणाची असावी म्हणून तिच्या बॅगेत तपासणी केली असता यात ही बॅग एका तरुणी तसेच ती वडगावची असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. कुटुंबीयांनी हंबरडा फोडलामाहिती मिळाल्यानंतर रावेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. विहिरीत शोध मोहीम राबविण्यात आली. बुधवारी दिवसभर शोध मोहीम राबविण्यात आली नाही. गुरूवारी सकाळी पुन्हा विहिरीत शोध घेतला असता तरुणीचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसला. मृत तरुणीची ओळख पटली आणि तिचं नाव शीतल वाघोदे असल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी वडगाव येथे घटनेची माहिती कळवली. बेपत्ता तरुणीचा शोध घेणाऱ्या कुटुंबीयांनी घटनास्थळ गाठले. मृत शीतल हीच असल्याचे समोर आल्यानंतर कुटुंबीयांनी जागेवरच हंबरडा फोडला. तरुणीने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. याबाबत रावेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/xqQ6kcg
No comments:
Post a Comment