जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड येथे गुन्ह्याच्या तपासासाठी जात असलेल्या आर्थिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांच्या शासकीय वाहनावर झाड कोसळले. या दुर्घटनेत वाहनातील दोन पोलीस कर्मचारी ठार तर तीन जण जखमी झाले आहेत. गुरुवारी रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास एरंडोल ते कासोदा दरम्यान अंजनी धरणाजवळ ही दुर्दैवी घटना घडली आहे. दरम्यान, दोन जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी दुजोरा दिला आहे. सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन दातीर आणि चालक अजय चौधरी हे जागीच ठार झाले आहेत. आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन दातीर आणि चालक अजय चौधरी तसेच चंद्रकांत शिंदे, नीलेश सूर्यवंशी, भरत जेठवे यांचे पथक गुरुवारी पिलखोड येथे तपासासाठी जात होते. यादरम्यान प्रवासात रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास एरंडोल ते कासोदा दरम्यान अंजनी धरणाजवळ चालत्या वाहनावर अचानक रस्त्यावर मोठा वृक्ष कोसळला. यात सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन दातीर आणि चालक अजय चौधरी हे जागीच ठार झाले. तर चंद्रकांत शिंदे, नीलेश सूर्यवंशी, भरत जेठवे हे तिघे गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच कासोदा पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. स्थानिकांच्या मदतीने जखमी पोलिसांना बाहेर काढण्यात आले. गंभीर जखमी सर्वांना एरंडोल येथे रुग्णालयात हलविण्यात आले आहे. यातील गंभीर जखमी असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन दातीर आणि चालक अजय चौधरी या दोघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच जळगाव येथून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले आहेत. या अपघाताची माहिती वाऱ्यासारखी पसरली. अपघाताच्या या दुर्दैवी घटनेने जिल्हा पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/iCMKFms
No comments:
Post a Comment