Breaking

Tuesday, June 20, 2023

तन रजयतन चघ आल तन महन रक; सगलतल रलयनस जवलस दरडयच खळबळजनक महत https://ift.tt/y7ZOHGz

: शहरातील रिलायन्स ज्वेल्स दरोडे प्रकरणी आता सांगली पोलिसांनी मोठी माहिती दिली आहे. दरोडा टाकणाऱ्या चौघा संशयित दरोडेखोरांची नावे शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. लवकरच या आरोपींचा शोध घेऊन गजाआड केलं जाईल, असा विश्वास देखील पोलीस अधीक्षक तेली यांनी व्यक्त केला आहे.सांगली शहरातल्या मिरज रोडवरील मार्केट यार्डजवळ असणाऱ्या रिलायन्स ज्वेलर्सवर ४ जून रोजी धाडसी दरोडा टाकण्यात आला होता. पाच ते सहा दरोडेखोरांनी सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करत दुकानात प्रवेश केला. बंदुकीचा धाक दाखवून दुकानातील कर्मचारी व ग्राहकांना ओलीस ठेवत संपूर्ण दुकानाचा सुपडा-साफ करण्यात आला.सुमारे ६ कोटी ४४ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, हिरे व मौल्यवान वस्तू आणि रोकड लंपास करण्यात आली होती. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. घटनेनंतर सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली, त्यानंतर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी देखील भेट देऊन दरोड्याची पाहणी केली होती.एखाद्या चित्रपटातल्या दृश्याप्रमाणे हा सर्व प्रकार घडला होता. तर दरोडेखोरांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पलायन केल्याचंही समोर आलं होतं. गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या गाड्या आणि कपडे बदलून पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न दरोडेखोरांनी केला होता. अत्यंत नियोजनबद्ध दरोड्याचा तपास लावणे पोलिसांच्या समोर मोठं आव्हान होतं.दरोडेखोर स्थानिक आहेत की परजिल्ह्यातले, की परराज्यातले याचा कोणताही पुरावा नसल्याने दरोडेखोरांचा तपास लावणे अवघड बनले होते. मात्र सांगलीच्या पोलिसांनी वेगवेगळ्या पथकांच्या माध्यमातून आणि तांत्रिक गोष्टींची मदत घेऊन योग्य दृष्टीने तपास करत दरोडेखोर नेमके कोणत्या जिल्ह्यातले, राज्यातले आणि कोण आहेत हे समोर आले आहे. दरोडा टाकण्यात आलेल्या चौघांची नावे पोलीस तपासात निष्पन्न झाली आहेत.गणेश उद्धव भद्रवार (हैदराबाद), प्रताप अशोकसिंग राणा (वय २५ रा. वैशाली, बिहार), कार्तिक नंदलाल मुजुमदार (वय २६, रा. पश्चिम बंगाल) आणि प्रिन्स कुमार सिंग (रा. वैशाली, बिहार) अशी संशयित दरोडेखोरांची नावे असल्याची माहिती पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी दिली आहे.या चौघांपैकी एकाकडून गेल्या तीन महिन्यांपासून शॉपीची रेकी करण्यात आल्याचं देखील पोलीस तपासामध्ये समोर आले आहे. दरोडेखोर वेगवेगळ्या राज्यातले असून त्यांच्या शोधासाठी वेगवेगळी पथके प्रयत्नशील असून त्यांना लवकरच गजाआड केलं जाईल, असा विश्वास बसवराज तेली यांनी व्यक्त केला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/RkwMxaK

No comments:

Post a Comment