Breaking

Saturday, June 24, 2023

Mumbai Rain Alert: मनसन आल र आल! मबईत ऑरज अलरट 'य' जलहयन पढल दवस मसळधर पवसच इशर https://ift.tt/iYmwlTq

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: तलावातील पाणीसाठ्यांनी गाठलेला तळ, खरिपाच्या रखडलेल्या पेरण्या आणि ऊन-घामांच्या धारांपासून सुटका होण्यासाठी संपूर्ण जून महिना प्रतीक्षा केल्यानंतर अखेर शनिवारी मुंबईमध्ये पावसाचे आगमन झाले. शहरासह उपनगरांमध्ये आनंदधारा बरसल्याने मृद्गंधाने मुंबईकर सुखावले.मेप्रमाणे जाणवणारा असह्य उकाडा, उन्हाचे चटके हे वातावरण अवघ्या एका रात्रीत बदलले. दक्षिण कोकणात शुक्रवारी मान्सून सक्रीय झाल्यानंतर शनिवारी कोकणातील मान्सूनरेषा अलिबागपर्यंत पुढे सरकल्याचे भारतीय हवामान विभागाने जाहीर केले. मान्सून सक्रीय झाल्यानंतर पहिल्याच दिवशी मुंबईमध्ये पावसाने दमदार उपस्थिती लावली. भारतीय हवामान विभागाने मुंबईतही रविवारसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला. रायगड जिल्ह्यामध्ये पुढील चार दिवसांसाठी आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुढील दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.मुंबईमध्ये शनिवारी सकाळी ८.३० पर्यंत कुलाबा येथे ०.२ तर सांताक्रूझ येथे ११.९ मिलीमीटर अशी २४ तासांमधील पावसाची नोंद झाली. तर सकाळी ८.३० ते सायं. ५.३० वाजता कुलाबा येथे १ मिलीमीटर आणि सांताक्रूझ येथे २८ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. मुंबई उपनगरांमध्ये दिवसभरात पावसाचा जोर अधिक होता, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली होती. त्यानुसार उपनगरांमध्ये सायंकाळनंतर पावसाचा जोर वाढला. सांताक्रूझ येथे ५.३० नंतर तीन तासांत ८८ मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे एकूण ११५.८ मिलीमीटर पाऊस १२ तासांमध्ये नोंदला गेला.मुंबईतील पावसाच्या आमगनामुळे मुंबईच्या कमाल तापमानाचा पाराही उतरला. शनिवारी कुलाबा येथे ३०.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. शुक्रवारपेक्षा शनिवारचे तापमान हे ३.८ अंशांनी खाली उतरले. सांताक्रूझ येथे ३२.८ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. शुक्रवारपेक्षा सांताक्रूझ येथील कमाल तापमान १.६ अंशांनी खाली उतरले. पावसाच्या आगमनासोबतच वातावरणात गारवा पसरला आणि मुंबईकरांनी काहिली कमी झाल्याचे समाधान व्यक्त केले.उपनगरांमध्ये तुरळक ठिकाणी दिवसभरात मुसळधार पावसाची म्हणजे ७० मिलीमीटरहून अधिक पाऊस सकाळी ७ वाजल्यापासून नोंदला गेला. स्वयंचलित केंद्रांवर नोंदल्या गेलेल्या माहितीनुसार, दहिसर येथे सायं. ७.३० पर्यंतच्या १२ तासांमध्ये १०७.५ मिलीमीटर, राम मंदिर येथे ८६.५ मिलीमीटर, सांताक्रूझ येथे १०६.५ मिलीमीटर, वांद्रे येथे ८५.५ मिलीमीटर, चेंबूर येथे ७५.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. महानगर पालिकेच्या स्वयंचलित केंद्रांवर नोंदलेल्या आकडेवारीनुसार सकाळी ८ ते रात्री ८ या कालावधीत मुंबई शहरामध्ये ६५.६, पूर्व उपनगरांमध्ये ६९.८ आणि पश्चिम उपनगरांमध्ये ७३.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या पूर्वानुमानुसार मुंबईमध्ये येत्या दोन दिवसांमध्ये मान्सून आगमन होण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. मान्सून आगमनासाठीचे निकष पूर्ण झाल्यानंतर मान्सूनचे आगमन जाहीर करण्यात येणार आहे. यामध्ये शनिवारच्या पावसाची उपस्थिती महत्त्वपूर्ण ठरणार आहे. दक्षिण आणि उत्तर कोकणात पुढील पाचही दिवस बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे. उत्तर कोकणात पावसाची व्याप्ती वाढेल, असाही अंदाज आहे.पहिल्याच पावसात मुंबई तुंबलीकिंग्ज सर्कल गांधी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी भरल्याने येथे वाहतूक मंदावली होती. अंधेरीतील मोगरा नालाही भरून वाहून लागल्याने त्याचा फटका अंधेरी सब वेला बसला. अंधेरी सब वेमध्येही पाणी साचल्याने येथील वाहतूक एस. व्ही. रोडमार्गे वळवण्यात आली होती. या सब वेमधील पाण्यातून वाट काढताना वाहनांच्या इंजिनात पाणी शिरल्याने वाहने बंद होत होती. दहिसर वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, कुर्ला एलबीएस परिसरातही पाणी साचले होते.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/uOkWUS9

No comments:

Post a Comment