Breaking

Saturday, June 24, 2023

छतत चक लगलयन तरणच मतय; लवह इन परटनरच 'टरबज थयर'; पलसन वगळच सशय https://ift.tt/7SdTRLn

चंदिगढ: छातीत चाकू लागल्यानं एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. छातीत चाकू लागल्यानंतर जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तरुणाला रुग्णालयात त्याच्या लिव्ह इन पार्टनरनं दाखल केलं. तरुणाच्या संशयास्पद मृत्यूनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांनी लिव्ह इन पार्टनरला ताब्यात घेऊन तिची चौकशी सुरू केली आहे.डीएलएफ फेज ३ मध्ये राहणाऱ्या ३५ वर्षीय संदिपला उपचारांसाठी नारायणा सुपर स्पेशॅलिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे त्याचा मृत्यू झाला. याची माहिती मिळताच डीएलएफ फेज ३ पोलीस ठाण्याचे कर्मचारी रुग्णालयात पोहोचले. 'टरबूज कापताना संदिपच्या छातीत चाकू लागला. त्यामुळे गंभीर जखम झाली. मी त्याला उपचारांसाठी रुग्णालयात आणलं. मात्र त्याचा मृत्यू झाला,' अशी माहिती संदिपची २५ वर्षीय प्रेयसी पूजा शर्मानं दिली. पूजा शर्मा झडौदा कला दिल्लीची रहिवासी असून ती एसएसबीमध्ये शिपाई म्हणून कार्यरत आहे. गेल्या चार वर्षांपासून पूजा आणि संदिप डीएलएफ फेज ३ च्या एस ब्लॉक ५५/५६ मध्ये लिव्ह-इनमध्ये राहत होते. संदिप कार खरेदी, विक्री करण्याची कामं करायचा. 'गुरुवारी रात्री दीड वाजता संदिपच्या मृत्यूची बातमी मिळाली. त्यानंतर आम्ही तातडीनं रुग्णालय गाठलं,' असं संदिपच्या कुटुंबियांनी सांगितलं. संदिपची लिव्ह इन पार्टनर पूजा शर्माला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त विकास कौशिक यांनी दिली. पूजाची चौकशी सुरू आहे. टरबूज कापताना चाकू लागल्याचं तिनं सांगितलं. संदिपच्या छातीत खोलवर जखम झाली होती. आम्हाला पूजाच्या विधानांवर, ती देत असलेल्या माहितीवर शंका आहे. त्यामुळे तिची चौकशी सुरू असल्याचं कौशिक यांनी सांगितलं.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/dslpLPT

No comments:

Post a Comment