नवी दिल्ली : देशातील सर्व शहरांमध्ये २ जून रोजी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर सुधारित करण्यात आले आहेत. देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या दरात कोणताही बदल झालेला नसून इतर महानगरांमध्येही पेट्रोल आणि डिझेलचे दर 'जैसे थे' आहेत. तर काही शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल नोंदवला गेला आहे. दरम्यान, कोणत्या शहरात इंधनाचे दर कुठे बदलले ते खालीलप्रमाणे जाणून घ्या.गेल्या काही दिवसांपासून जागतिक बाजारात क्रूड ऑइलच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत असून आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीही खाली आल्या आहेत. WTI कच्च्या तेलात ०.१७ टक्क्यांनी घट झाली आणि प्रति बॅरल $७०.१९ वर व्यवहार करत आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड ऑइल ०.१२% वाढून प्रति बॅरल $७४.४५ वर व्यापार करत आहे.तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलच्या किमती तपासून घ्यासरकारी तेल विपणन कंपन्या म्हणजेच OMCs दररोज पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर करतात. सरकारी कंपन्या अधिकृत वेबसाइटवर सकाळी ६ वाजता दर अपडेट करतात. आणि रोजच्या प्रमाणे आजही वाहन इंधनाचे नवीन दर जाहीर आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झाल्यावर सरकारी तेल विपणन कंपन्या वेबसाइटवर अपडेट करतात. मात्र, जर तुम्हाला तुमच्या शहराची किंमत जाणून घ्यायची असेल, तर तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत वेगवेगळ्या प्रकारे जाणून घेऊ शकता. तुम्ही पंपावर न जात घरीबसल्याची पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किंमती जाणून घ्यायच्या असतील तर ही माहिती अगदी सहज करू शकता. तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती तेल विपणन कंपन्यांच्या वेबसाइटवर जाऊन किंवा एसएमएस पाठवून नवीन किमती तपासू शकतात. सरकारी तेल विपणन कंपन्यांचे इंडियन ऑइलचे ग्राहक RSP<डीलर कोड> टाइप करून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर एसएमएस पाठवून इंधनाची किंमत तपासू शकतात. तसेच HPCL ग्राहक HPPRICE <डीलर कोड> म्हणून ९२२२२०११२२ वर, आणि बीपीसीएल ग्राहक <डीलर कोड> म्हणून ९२२३११२२२२ वर एसएमएस पाठवू शकतात.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/JyuSakX
No comments:
Post a Comment