Breaking

Friday, June 23, 2023

Pune Crime: लषकरत नकरल लवत सगयच वरदत भटयच; तरणच फसवणक ततय अधकऱयल अटक https://ift.tt/WOihb0J

पुणे: भारतीय लष्करात नोकरी लावून देण्याचे खोटे आश्वासन देत एका तोतया अधिकाऱ्याने उमेदवार तरुणाची तब्बल २८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तरुणाला विश्वास बसावा म्हणून सात ते आठ डमी अधिकाऱ्यांना भारतीय लष्कराचा गणवेश परिधान करून सरावासाठी बोलवण्यात आलं होतं. त्यानंतर तरुणाला सरावासाठी यायला लागेल अशी खोटी बतावणी करून, बनावट भरतीची मेरिट लिस्ट तयार करून तरुणाला पाठवत त्याच्याकडून २८ लाख रुपये घेतले. मात्र त्यानंतर भरती किंवा पुढील प्रक्रिया बाबत कोणताही पाठपुरावा झाला नसल्याने आपली फसवणूक झाल्याचं तरुणाच्या लक्षात आलं. त्यानंतर तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपीला ताब्यात घेण्यासाठी तपासाचा वेग वाढवत गुन्हा शाखा २ पथक सोबत मिलिटरी इंटेलिजन्सच्या वतीने आरोपीचा शोध सुरू केला. आरोपीचा पत्ता जत, सांगोला या ठिकाणी निष्पन्न झाल्यानंतर पथक रवाना करून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. प्रमोद भीमराव यादव (वय २७) असे अटक करण्यात आलेल्या तोतया अधिकाऱ्याचे नाव आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार सप्टेंबर २०२२ पासून सुरू होता.याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी राहुल हा भारतीय लष्करात भरतीसाठी प्रयत्न करत होते. यावेळी त्यांची ओळख आरोपी प्रमोद यादव यांच्याशी झाली. फिर्यादीच्या भेटीवेळी यादव आर्मीचा युनिफॉर्म परिधान करून भेटला आणि भारतीय लष्करात नोकरी लावून देतो असं सांगितल. परीक्षेचं कारण देत वेळोवेळी पैशांची मागणी केली. तसेच परीक्षा देण्यासाठी तुम्हाला यायला लागेल, परीक्षेची तयारी करावी लागेल असे खोटे मार्गदर्शन देखील केले.इतकचं नव्हे तर आरोपी यादवने फिर्यादी राहुलचा विश्वास संपादन करण्यासाठी भारतीय लष्कराच्या युनिफॉर्ममध्ये सात ते आठ तोतया अधिकारी उभे देखील केले . हा प्रकार सप्टेंबर २०२२ पासून ते १८ जून २०२३ पर्यंत सुरू होता . यादरम्यान आरोपीने फिर्यादी तरुणाकडून जवळपास २८ लाख ८८ हजार रुपये उकळले. इतके दिवस झाले आणि एवढे पैसे देऊन आपल्या भरतीसाठी काहीही हालचाल होत नाही, हे बघून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात राहुल याच्या लक्षात आले. यानंतर त्याने कोंढवा पोलीस स्टेशन येथे याबाबत तक्रार दाखल केली.आरोपी हा मूळचा नाशिक येथील असून तो काही वर्षांपासून पुण्यातील कोंढवा परिसरात राहत आहे. त्याने फिर्यादी राहुल याला कोंढवा येथेच राहत्या घरी भेटायला बोलावलं आणि तिथं त्याने आर्मीचा पोषाख परिधान करून माझी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचं देखील वेळोवेळी सांगितल. धक्कादायक बाब म्हणजे भारतीय लष्करात नोकरी लावून देतो या प्रकरणात १०० हून अधिक तरुणांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. अधिक तपास पोलीस करत आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/4gOkKhb

No comments:

Post a Comment