Breaking

Friday, June 23, 2023

Pune News: पणकरसठ महततवच बतम; सवचछतगह शधतय? ह अप आह न! एक कलकवर महत https://ift.tt/PQSR6Ee

म. टा. प्रतिनिधी, पुणे : खरेदीसाठी किंवा फिरण्यासाठी घरातून बाहेर पडल्यानंतर गरज भासल्यास सार्वजनिक स्वच्छतागृह कुठे आहेत, याचा शोध घ्यावा लागतो; पण आता शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृह कुठे आहेत, याची माहिती आता टॉललेट सेवा या मोबाइल अ‍ॅपवर उपलब्ध होणार आहे. त्या विषयीचा अभिप्राय अथवा तक्रारही नोंदवता येणार आहे. मूळच्या पुणेकर, पण सध्या अमेरिकी नागरिक असलेल्या अमोल भिंगे यांनी हे अॅप विकसित केले आहे.या अ‍ॅप्लिकेशनचे औपचारिक उद्घाटन महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रमकुमार यांच्या हस्ते झाले. अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त आशा राऊत आदी या वेळी उपस्थित होते."नूतन मराठी विद्यालय आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा मी माजी विद्यार्थी आहे. आपल्या मातृभूमीसाठी काहीतरी करावे, या भावनेतून मी माझ्या सहकाऱ्यांसह स्टार्टअपच्या माध्यमातून या अ‍ॅप्लिकेशनची निर्मिती केली. या अ‍ॅपचा वापर करून नजिकचे स्वच्छतागृह शोधता येईल, स्वच्छता, गुणांकन, अंतर आदी श्रेणीत स्वच्छतागृहांचा शोध घेता येईल. किंवा शोधलेल्या स्वच्छतागृहात कोणत्या सुविधा आहेत, त्याची माहितीही घेता येईल. वॉश बेसिन, पाणी, लिक्विड सोप किंवा सॅनिटायजर, कचऱ्याचे डबे, दिवे, सॅनिटरी नॅपकिन्स, पेपर नॅपकिन अशा सुविधा असलेल्या स्वच्छतागृहांची माहिती स्वतंत्रपणे पाहायला मिळेल", असे भिंगे यांनी सांगितले.'महापालिकेच्या सार्वजनिक स्वच्छतागृहांची सेवा अधिक सुधारण्यात येत आहे. १५ आकांक्षी स्वच्छतागृहेही उभारण्यात येत आहेत. टॉयलेट सेवा या अ‍ॅपवर येणाऱ्या प्रतिक्रिया, अभिप्रायांचा वापर सेवा सुधारण्यासाठी केला जाईल', असे डॉ. खेमनार यांनी सांगितले."या अ‍ॅपमध्ये स्वच्छतागृहांना गुणांकन देण्याची सुविधाही उपलब्ध आहे. त्यामुळे थेट नागरिकांकडून मूल्यांकन होऊन स्वच्छतागृहांची परिस्थिती सुधारण्यास मदत होईल", असे विक्रमकुमार म्हणाले.हे अ‍ॅप मराठी, हिंदी, इंग्रजीत विनामूल्य उपलब्ध आहे. स्वच्छतागृहांबाबतचा अभिप्राय दरमहा महापालिकेकडे सादर केला जाईल. खासगी हॉटेल, मॉल, दालने, कंपन्या आदी ठिकाणची स्वच्छतागृहांचीही माहिती या अ‍ॅपवर उपलब्ध आहे, त्यासाठी संबंधितांची परवानगी घेण्यात आली आहे.- अमोल भिंगे, ॲप डेव्हलपर


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/HTh4sRL

No comments:

Post a Comment