Breaking

Monday, June 26, 2023

समर आललय जपल वचवतन ST बस उलटल अपघतत परवस जखम https://ift.tt/1uPLD6v

धाराशिव : भूम डेपोच्या बसला मोठा अपघात झाला. या अपघातात २३ प्रवासी जखमी झाले आहेत. बार्शीहून भूमकडे येताना भांडगावच्या माळी वस्तीजवळ हा अपघात झाला. समोर आलेल्या जीपला वाचवताना भूम डेपोची एसटी बस उलटली. यामुळे झालेल्या अपघातात २३ प्रवासी जखमी झालेत. ही घटना सोमवारी दुपारी भांडगावच्या माळी वस्तीजवळ घडली. जखमींना उपचारासाठी भूमच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बसचे चालक दळवी हे कीरकोळ जखमी झाले आहेत. या बाबत अधिक माहिती समोर आली आहे. भूम अगाराची बस बार्शीहून भूमकडे जात असताना क्रुजर जीप बसच्या समोर आली. जीपला वाचविण्या प्रयत्नात बस रस्त्यावरून खाली गेल्याने ती उलटली. या अपघातामध्ये २३ प्रवासी जखमी झाले. बसमध्ये एकूण ४० प्रवासी होते. अपघात घडताच जवळ असलेल्या नागरीकांनी धाव घेतली. एसटीच्या मागील काच फोडून जखमींना बाहेर काढण्यात आले. अपघात स्थळी अगार प्रमुख बी. एल.. लांडगे यांनी भेट देऊन पाहणी केली. सर्व जखमींना भूम येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एसटी आगाराकडून जखमींना ५०० रुपयांची आर्थिक मदत करण्यात आल्याची माहिती आगार प्रमुख बी. एल. लांडगे यांनी दिली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/s2zVPLC

No comments:

Post a Comment