म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : नाशिक शहरासह जिल्ह्यात सोमवारी कमी अधिक प्रमाणात पावसाच्या संततधार सरी कोसळल्या. दोन दिवसांत जिल्ह्यातील ९२ पैकी ४० मंडळांना पावसाने हुलकावणी दिली. मंगळवारी (दि. २७) घाटमाथा क्षेत्रात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असून इगतपुरी, त्र्यंबकेश्वरसह काही तालुक्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे.जिल्हावासियांना यंदा पावसाने मोठी प्रतिक्षा करायला लावली. गतवर्षी जूनमध्ये सरासरीच्या ८४.४ टक्के पाऊस झाला होता. यंदा आतापर्यंत केवळ २३.६ टक्के पाऊस झाला आहे. सोमवारी सकाळी साडेआठपर्यंत विभागात सरासरी २.६ मिमी पाऊस पडला. तर, जिल्ह्यात सरासरी ३.३ मिमी पावसाची नोंद झाली. बागलाण, नांदगाव, येवला तालुक्यांत पावसाने दडी मारली, तर मालेगाव, निफाड, सिन्नर, चांदवड, देवळा या तालुक्यांत तुरळक सरी पडल्या. कळवण, सुरगाणा, नाशिक, दिंडोरी, इगतपुरी, पेठ आणि त्र्यंबकेश्वर या तालुक्यांत काही मंडळांत दमदार पावसाची नोंद झाली. इतर मंडळांना पावसाची प्रतीक्षा आहे.अन्य जिल्ह्यांमध्ये काय आहे स्थिती?जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून हुलकावणी देणाऱ्या पावसाने सोमवारी हजेरी दिली. सकाळी तासभर हलक्या सरींनंतर साडेअकारा वाजता १५ मिनिटे पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. जिल्ह्यात सर्वत्रच कमी-जास्त प्रमाणात हा पाऊस झाला. दुसरीकडे खान्देशातील धुळे व नंदुरबार जिल्ह्यात अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, पावसाचे आगमन झाल्याने जळगाव जिल्ह्यात पेरण्याची लगबग सुरू झाली आहे.नाशिक शहरात दोन मिमी पाऊससोमवारी शहरवासीयांची सकाळ पावसाच्या दर्शनाने उजाडली. रात्रीही शहरातील बहुतांश भागात पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे सोमवारी दुपारपर्यंत अनेक उपनगरांत विजेचा लपंडाव सुरू होता. सोमवारी सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच या कालावधीत २ मिमी पाऊस नोंदविला गेला.इगतपुरीत जोरदार पाऊसगेल्या महिनाभरापासून पावसाच्या प्रतीक्षेत आणि पेरणीपासून चिंतेत असलेला बळीराजा अखेर मान्सूनच्या आगमनाने सुखावला. इगतपुरी तालुका म्हंटल की उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक पावसाचा भाग, धरणांचे आगार, पर्यटनाचा व्यापक परिसर, व निसर्गाचा खजिना म्हणून परिचित आहे. हा इगतपुरी तालुका गेल्या महिनाभरापासून वरुणराजाच्या प्रतीक्षेत होता. बहुतांश शेतकऱ्यांनी भात बियाणांची पेरणी केली, तर काही पेरणीसाठी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत होते. रोहिणी व मृग ही दोन्ही नक्षत्रे कोरडी गेल्याने शेतकरी वर्ग आकाशाकडे नजरा लावून होता.नाशिक जिल्ह्यातील पावसाची स्थिती (मिमी)-तालुका---२६ जून २०२३ पर्यंतचा पाऊस---२६ जून २०२२ रोजीपर्यंतचा पाऊसमालेगाव---५६.७---१६५.९बागलाण---२६.९---११२.४कळवण---५४.१---१३२.२नांदगाव---२६.९---१५१.९सुरगाणा---३४.७---१६४.०नाशिक---११.०---९१.६दिंडोरी---२२.९---१२९.४इगतपुरी---३६.५---९४.४पेठ---४६.७---१८१.३निफाड---३२.२---१०१.८सिन्नर---२५.८---१२७.१येवला---४२.६---५३.७चांदवड---२५.०---१९३.३त्र्यंबकेश्वर---७८.५---१२५.३देवळा---५०.८---१२७.३सरासरी एकूण---३५.७---१२७.६
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3wDN4iU
No comments:
Post a Comment