Breaking

Monday, June 26, 2023

धककदयक! 'दल स बर लगत ह' फम यटयबरच नधन; अवघय वय वरष रसत अपघतत गल जव https://ift.tt/9zb0Lrq

रायपूर: लोकप्रिय युट्यूबर देवराज पटेलच्या चाहत्यांसाठी अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. वयाच्या २२ व्या वर्षी रस्ते अपघातात त्याचे निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थान राज्यातील रायपूर याठिकाणी लांभाडी चौकात ही घटना घडली. केवळ चाहतेच नव्हे तर अनेक युट्यूबरनी या घटनेनंतर शोक व्यक्त केला आहे. सोमवारी २६ जून रोजी ही घटना घडली. सोशल मीडियावरुन कधी कोणाला प्रसिद्धी मिळेल, कोण कधी व्हायरल होईल सांगता येत नाही. युट्यूबर देवराजसोबतही तसंच काहीसं घडलं होतं. त्याचा 'दिल से बुरा लगता है यार' हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आणि तो सर्वांचा लाडका बनला. मात्र लोकांना हसवणाऱ्या या विनोदी युट्यूबरसोबत अशी दुर्दैवी घटना घडेल, असे कोणाच्याही ध्यानीमनी नव्हते. नेमकं काय घडलं?यूट्यूबर ज्या बाइकवरुन जात होता, त्या बाइकला एका अनियंत्रित भरधाव ट्रकने धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात देवराजला जीव गमवावा लागला. देवराज मूळचा महासमुंद जिल्ह्यातील रहिवासी होता. व्हिडिओच्या संदर्भात गोष्टींसाठी तो रायपूरमध्ये राहायचा. दरम्यान, सोमवारीही व्हिडिओ बनवण्यासाठी जात असताना रायपूर शहरातील लाभांडी भागात भरधाव ट्रकच्या धडकेचा तो बळी ठरला. मीडिया रिपोर्टनुसार, अपघातात देवराज पटेल यांचा जागीच मृत्यू झाला. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी व्यक्त केला शोकया घटनेनंतर राजस्थानचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी देवराजच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे. बघेल यांनी केलेल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, 'दिल से बुरा लगता है'च्या माध्यमातून कोट्यवधी लोकांमध्ये आपली जागा निर्माण करणारे, आम्हाला सर्वांना हसवणारे देवराज पटेल आज आपल्यात नाहीत. या तरुण वयात अशाप्रकारची आश्चर्यकारक प्रतीभा गमावणे खूप दुःखदायक आहे. देव त्यांच्या कुटुंबीयांना आणि प्रियजनांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. ओम शांती:' देवराज महासमुंद जिल्ह्यातील दाब पाली गावचा रहिवासी होता, त्याचे संपूर्ण कुटुंबही याच गावात राहते. वडील घनश्याम पटेल शेती करतात तर देवराजचा आणखी एक भाऊ असून ज्याचं नाव हेमंत असे आहे. देवराजचे युट्यूबवर ४ लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत. त्याच्या व्हिडिओंना लाखो व्ह्यूज मिळायचे. तो वेगवेगळ्या विषयांवर मजेदार व्हिडिओ बनवत असे. २०२१ साली त्याने प्रसिद्ध युट्यूबर भुवन बामसोबत 'धिंडोरा'मध्येही काम केले होते. देवराज छत्तीसगड सरकारच्या डॉक्युमेंट्री फिल्म्समध्ये काम करायचा. त्याने गेल्या वर्षी मुख्यमंत्र्यांसोबत एक व्हिडिओही बनवला होता जो सोशल मीडियावर व्हायरल झालेला. याशिवाय निधनाच्या काही तास आधीच त्याने इन्स्टाग्रामवर शेवटचा व्हिडिओ पोस्ट केला होता.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/HJhEvPi

No comments:

Post a Comment