म. टा. प्रतिनिधी, पुणे/नाशिक : वातावरणातील अनुकूल बदलांमुळे येत्या रविवारपासून पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे. त्यामुळे २४ जूनपासून पुण्यात आठवडाभर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या, तर नाशिकमध्ये सोमवारपासून (दि. २६) पाऊस बरसण्याची शक्यता आहे. जूनचा पंधरावडा उलटला तरी तापमानात घट झाली नसल्याने त्रस्त झालेल्या नाशिककरांची उकाड्यापासून सुटका होण्याची आशा आहे.पावसाने दडी मारल्याने नागरिक सध्या उन्हापासून बचावासाठी छत्रीचा वापर करीत आहेत. मात्र, पुढील चार दिवसात चित्र बदलणार असून, नाशिक, पुण्याबरोबरच मध्य महाराष्ट्रातही काही दिवस समाधानकारक पाऊस होईल, असे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.दरम्यान, विदर्भामध्ये सध्या उष्णतेची लाट आल्याने तापमानाचा पारा चाळीस अंशाच्या पुढे रेंगाळला आहे. तर, मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा ३७ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. मध्य महाराष्ट्रातही बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त होते.वातावरणातील अनुकूल घडामोडींमुळे पावसासाठी चांगले दिवस आहेत. शनिवार, २४ जूनपासून पुण्यामध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे. रविवारनंतर मध्यम स्वरूपाचा आणि पुढील दोन दिवस घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत विदर्भातील उष्णतेची लाट ओसरणार असून, बहुतांश ठिकाणी तापमानात घट होणार आहे.अनुपम कश्यपी, प्रमुख (हवामान अंदाज)भारतीय हवामानशास्त्र विभाग
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/HjAbexz
No comments:
Post a Comment