Breaking

Monday, July 3, 2023

जत क हवस नह कस प कई बस... गणयवर रल बनवल अन मग कबडड परशकषकच भयकर पऊल https://ift.tt/f4uRMeY

कानपूर: एका प्रशिक्षकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्येचे पाऊल उचलण्यापूर्वी त्याने 'जीत की हवस नहीं किसी पे कोई बस नहीं...' या गाण्यावर रील बनवलं आणि सोशल मीडियावर पोस्ट केलं होतं. त्याने उचललेल्या या टोकाच्या पावलामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्याचवेळी पोलिसांनी माहिती मिळताच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. घरात कुठलीही समस्या नसल्याची माहितीकबड्डी प्रशिक्षक विक्रांत उपाध्याय (२५ वर्षे) कानपूरच्या पंकी भागातील एफ-ब्लॉक गणेश शंकर विद्यार्थी नगरमध्ये राहत होता. तो अर्मापूरच्या मैदानावर मुलांना कबड्डीचे प्रशिक्षण देत असे. त्याच्या घरी कोणतीही समस्या नव्हती आणि त्याचे कोचिंग देखील चांगले चालले होते, असं सांगितलं होतं.पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कुटुंबीयांची चौकशी केलीकुठलीच समस्या नसताना त्याने आत्महत्येसारखे भयंकर पाऊल का उचलले हे कुटुंबीयांनाही समजू शकलेले नाही. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून कुटुंबीयांची चौकशी केली. त्याच्या खोलीचीही झडती घेतली. मात्र, तेथून कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही.आत्महत्या करण्यापूर्वी रील बनवला आणि सोशल मीडियावर पोस्ट केलंमात्र, मृत्यूला कवटाळण्यापूर्वी त्याने 'जीत की हवस नहीं किसी पे कोई बस नहीं क्या जिंदगी है ठोकरों पर मार दो, मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यों डरें...' या गाण्यावर रील बनवून सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यानंतरच त्याने रात्री आपल्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांकडून तपास सुरुयाप्रकरणी एडीसीपी अशोक कुमार सिंह यांनी सांगितले की, पंकी येथे एका क्रीडापटूने आत्महत्या केली आहे. घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. यासोबतच अद्यापपर्यंत कुटुंबीयांकडून कोणतीही तक्रार आलेली नाही. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/sLUTotC

No comments:

Post a Comment