Breaking

Monday, July 3, 2023

रजर फडरर पनह एकद Wimbledon मधय परतणर नवततनतर कय करणर पह... https://ift.tt/9SzGUDA

लंडन : रॉजर फेडरर मंगळवारी विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या सेंटर कोर्टवर परतणार आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी नव्हे, तर त्याच्या विक्रमांनी परिपूर्ण कारकिर्दीबद्दल स्पर्धेचे आयोजक हा सन्मान करणार आहेत. गेल्याच वर्षी आंतरराष्ट्रीय टेनिसमधून निवृत्ती स्वीकारणाऱ्या फेडररने २० ग्रँडस्लॅम जेतेपदे पटकावली असून यात ऑल इंग्लंड क्लबवर रंगणाऱ्या आठ विम्बल्डन जेतेपदांचा समावेश आहे.सातवेळा विम्बल्डन जिंकणाऱ्या सेरेना विल्यम्सने हे आमंत्रण सध्या नाकारले आहे. २३ ग्रँडस्लॅम जेतेपदे पटकावणारी सेरेना गरोदर असून ती सध्या प्रवास करणे टाळत आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली. मार्टिना नव्हरातिलोव्हाच्या नावावर सर्वाधिक नऊ विम्बल्डन जेतेपदांची नोंद आहे. 'मंगळवारी रॉजर फेडरर आपल्यासोबत असेल हे सांगताना आम्हाला खूप आनंद होतो आहे. लढतींना सुरुवात होण्याआधी सेंटर कोर्टवर या अवलियाचा सन्मान करणार आहोत; कारण पुरुषांच्या एकेरीत त्यानेच आतापर्यंत सर्वाधिक विम्बल्डन जेतेपदे पटकावली आहेत', असे ऑल इंग्लंड क्लबच्या अध्यक्षा सॅली बॉल्टन म्हणाल्या.गतवर्षीच्या बंदीनंतर सोमवारी रशिया आणि बेलारुसच्या टेनिसपटूंसाठी विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेचे दार पुन्हा खुले झाले. महिलांमध्ये बेलारुसच्या १९व्या सीडेड व्हिक्टोरिया अझरेन्काने, तर पुरुषांमध्ये रशियाच्या सातव्या सीडेड आंद्रे रुब्लेव्हने विजयी सलामी दिली. युक्रेनवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रशिया आणि बेलारूसच्या टेनिसपटूंना गेल्यावर्षी विम्बल्डनप्रवेश नाकारण्यात आला होता. यंदा या खेळाडूंना प्रवेश दिला असला तरी त्यांना तटस्थ खेळाडू म्हणून भाग घेण्याची मुभा आहे. हे खेळाडू रशिया किंवा बेलारुसचे प्रतिनिधित्व करू शकत नाहीत. रुब्लेव्हने एक तास ३३ मिनिटांत पर्सेलवर ६-३, ७-५, ६-४ अशी मात केली तर अझरेन्काने चीनच्या युआनचे आव्हान ६-४, ५-७, ६-४ असे परतवून लावले. किर्गिओसची माघारनिक किर्गिओसने मनगटाच्या दुखापतीमुळे विम्बल्डनमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. गतउपविजेत्या किर्गिओसला स्पर्धेत ३०वे सीडिंग होते अन् त्याची सलामी सोमवारी डेव्हिड गॉफिनशी होणार होती. सामन्यांचे निकाल : पहिली फेरी- जोकोविच वि. वि. कॅचिन ६-३, ६-३, ७-६ (७-४). गॉफिन वि. वि. मरोझसन ६-२, ५-७, ६-२, ६-०. रुब्लेव्ह वि. वि. परसेल ६-३, ७-५, ६-४. मुसेती वि. वि. व्हरिलास ६-३, ६-१, ७-५. हुर्काझ वि. रामोस ६-१, ६-४, ६-४.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/08OBX9W

No comments:

Post a Comment