मुंबई : अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीतील एक गट फुटून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. दरम्यानच्या काळात विधानपरिषदेच्या उपसभापती नीलन गोऱ्हे यांही उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदे ग़टात सहभागी झाल्या. यानंतर उद्धव ठाकऱ्यांच्या शिवसेनेने रणशिंग फुंकण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांचेच संकेत शिवसेनेने आणि यांनी केलेल्या एका ट्विटद्वारे मिळत आहेत. खासदार संजय राऊत यांनी उदधव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली असून त्या मुलाखतीचे वर्णन त्यांनी वर्षातील सर्वात मोठी आणि असे केले आहे. तसेच आवाज महाराष्ट्राच्या कुटुंबप्रमुखाचा, असे नाव या मुलाखतीला दिले आहे. या मुलाखतीचा प्रोमो ठाकरे गटाने सार्वजनिक केला आहे. या स्फोटक मुलाखतीत ठाकरे नेमके काय बोलणार याकडे म्हणूनच सर्वांचेच लक्ष लागले आहे.सामनाचे कार्यकारी संपादक, खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची ही मुलाखत घेतली आहे. राऊत यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. जोरदार असे कॅप्शन राऊत यांनी या ट्विटला दिले आहे. या मुलाखतीचा पहिला भाग बुधवार दिनांक २६ जुलै रोजी सकाळी ८ वाजता प्रसारित केला जाणार आहे. तर दुसरा भाग हा शुक्रवार दिनांक २७ जुलै २०२३ रोजी सकाळी ८ वाजता प्रसारित होईल.या मुलाखतीतलं संभाषण जसंच्या तसं...संजय राऊत : वर्षभरापूर्वी अशाच मुसळधार पावसामध्ये तुमच्या नेतृत्वाखालील सरकार वाहून गेलं होतं.उद्धव ठाकरे : वाहून नव्हतं गेलं, खेकड्यांनी धरण फोडलं होतं.संजय राऊत : ते असं म्हणत आहेत, देवेंद्र फडणवीस की, उद्धव ठाकरे यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसलाउद्धव ठाकरे : मग राष्ट्रवादीने काय खुपसलं होतं की जेणेकरुन तुम्ही राष्ट्रवादी तोडली? उठसूट दिल्लीला मुजरा मार ही आपली संस्कृती नाहीय.संजय राऊत : लोकशाही वाचणवणार का?उद्धव ठाकरे : लोकशाही साधा माणूस वाचवणार.उद्धव ठाकरे : बाबरीच्या वेळेला जबाबदारी घ्यायला नव्हता. राम मंदिराचा निर्णय तुम्ही घेतला नाही. मग राम मंदिराचं श्रेय कसं घेऊ शकता?”, असा सवाल उद्धव ठाकरे या मुलाखतीत भाजपला करताना दिसत आहेत. “देशावर जो प्रेम करतो. देशासाठी जो मरायला तयार आहे तो हिंदू आहे. माझा देश माझा परिवार आहे हे माझं हिंदुत्व.उद्धव ठाकरे : आज माझ्याविरुद्ध अख्खा भाजप आहे, तरी देखील तुम्हाला उद्धव ठाकरेची भिती का वाटते? उद्धव ठाकरे एकटा व्यक्ती नाही आहे. उद्धव ठाकरे म्हणजे बाळासाहेबांचे विचार आहेत. आणि मला संपवण्यात तुम्हाला आनंद असेल ना संपवा. बघू ना मग माझ्या वडिलांचे आशिर्वाद, माझ्या जनतेची सगळी साथसोबत आणि तुमची ताकद.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/b9rMEnA
No comments:
Post a Comment