Breaking

Monday, July 24, 2023

हॉटेलमध्ये एकत्र आले, पण जाताना तो एकटाच गेला; कर्मचाऱ्यांनी खोलीचं दार उघडताच हादरवणारं दृश्य https://ift.tt/trzF1El

चंदीगड: हॉटेलच्या खोलीतून एका महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. कर्नालच्या असंधमध्ये ही हादरवून सोडणारी घटना घडली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला तिच्या प्रियकरासह हॉटेलमध्ये थांबली होती. हत्येनंतर प्रियकर फरार असल्याचे सांगण्यात येत आहे.हॉटेलमध्ये महिलेला मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळून आल्याने खळबळकर्नालमधील सफिदो रोडवरील असंध येथील हॉटेलमध्ये एका महिलेचा मृतदेह संशयास्पद स्थितीत सापडला आहे. मृतदेह पाहिल्यानंतर हॉटेल कर्मचाऱ्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला. घटनास्थळावरून महिलेचे ओळखपत्र जप्त करण्यात आले आहे. या आयडीवरून ही महिला दिल्लीची रहिवासी असून विवाहित असल्याचे आढळून आलं आहे. दोन वर्षांपूर्वी प्रियकराशी भेटमहिलेच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले की, दोन वर्षांपूर्वी महिलेची मनोज नावाच्या व्यक्तीशी भेट झाली होती. मनोज हा सोनीपतचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. महिलेचे लग्न झाले होते, मात्र असे असतानाही दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू होते. त्याचबरोबर कर्नाल येथील या हॉटेलमध्ये महिला आणि मनोज पूर्वीही येऊन राहायचे, अशीही माहिती पोलिसांना मिळाली आहे. एकत्र राहण्यावरुन दोघांमध्ये वादमिळालेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये एकत्र राहण्यावरून काही मतभेद झाले होते. त्यानंतर ही घटना घडली. सध्या पोलीस आणि एफएसएलने पुरावे गोळा केले आहेत. सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहे. महिलेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतरच सर्व गोष्टी स्पष्ट होतील, असे पोलिसांचे म्हणणे आहे. सध्या पोलिसांनी महिलेचा प्रियकर मनोजचा शोध सुरू केला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/YElTROW

No comments:

Post a Comment