Breaking

Friday, July 21, 2023

रायगडमधील आंबा नदी धोका पातळीवर; दुर्गम भागातील नागरिकांचे स्थलांतर, प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा https://ift.tt/s8TiOIG

रायगड: कोकणात रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसामुळे नद्या धोक्याची पातळी ओलांडण्याच्या जवळ आहेत. तर आंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पूरसदृश्य स्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. तर कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. खेड जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवर पातळीवर आहे. सात मीटर ही तिची धोकादायक पातळी आहे. आंबा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत असून ९.५० मीटर या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. नऊ मीटर ही आंबा नदीची धोकादायक पातळी आहे. कुंडलिका नदीची इशारा पातळी २३ मीटर आहे. सध्या ही नदी २३.१० मीटरवर वाहत आहे. नदीची धोकादायक पातळी २३.९५ आहे. त्यामुळे रोहा येथे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान रायगड जिल्ह्यातील वाकण-पाली रस्त्यावरील पुलावरूनही पाणी वाहत होते. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे काहीकाळ बंद करण्यात आली होती. संध्याकाळी उशिरा या रस्त्यावरची वाहतूक सुरू करण्यात आली आहे. पेण तालुक्यातील अतिशय दुर्गम भाग असलेल्या चांदेपट्टी गावाला मागील १८ वर्षापासून दरड आणि भूस्खलन भीतीच्या छायेखाली राहावं लागत आहे. पावसाळा सुरू झाला की गावातील नागरिकांना तात्पुरते स्थलांतर केले जाते. पण त्यानंतर या गावाकडे कोणी अधिकारी फिरकून सुद्धा पाहत नसल्याने येथील गावकरी मेटाकुटीला आले आहेत. पेण तालुक्यातील चांदेपट्टी गावावर गेली १८ वर्षापासून दरडीची टांगती तलवार आहे. पेणच्या तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे यांनी गावातील ३४ ग्रामस्थांना तात्पुरते स्थलांतरित केले आहे. प्रशासन तात्पुरते स्थलांतर करतं पण आमच्या उदरनिर्वाहाचे साधन शेती आहे. त्यामुळे शेती लागवडीच्या काळात दरवर्षी आम्हाला गावाबाहेर आणले जाते. आमची गुरे, कोंबड्या यांचा कोणी विचार देखील करत नाहीत. यावर्षी आम्ही प्रशासनाला सहकार्य करू, पण पुढच्या वर्षी प्रशासनाने आमचा विचार केला तर आम्ही आहोत तिथेच राहू अशा प्रतिक्रिया गावातील ग्रामस्थांनी दिल्या आहेत. पेणच्या तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे या स्वतः प्रत्यक्ष जाऊन ग्रामस्थांजवळ संवाद साधला आहे. रायगड जिल्हा प्रशासन या सगळ्यावर लक्ष ठेवून आहे. गणपतीवाडी येथील मराठा समाज भवनात या सगळ्या ग्रामस्थांची व्यवस्था करण्यात आली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/GR6l8Qf

No comments:

Post a Comment