Breaking

Saturday, July 8, 2023

Monsoon 2023: ककणकरसठ महततवच बतम; पवसबबत हवमन वभगच अदज जहर; महणल... https://ift.tt/pxuSb9Q

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात बहुतांश ठिकाणी समाधानकारक पाऊस असल्याचे प्रादेशिक हवामान विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र येत्या चार-पाच दिवसांमध्ये कोकणातील पावसाचा जोर ओसरण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. राज्यात १ ते ८ जुलै या कालावधीत सरासरीच्या ३५ टक्के पाऊस अतिरिक्त नोंदला गेला आहे.कोकणामध्ये जुलैच्या पहिल्या आठवड्यात ८० टक्के, मध्य महाराष्ट्रात ३० टक्के, मराठवाड्यात ७९ टक्के अतिरिक्त तर विदर्भात १६ टक्के पावसाची तूट आहे. कोकण आणि मराठवाड्यात गेल्या आठवड्यात चांगला पाऊस झाल्याने जुलै पहिल्या आठवड्यातील पावसाची सरासरी अतिरिक्त झाली आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबई उपनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, यवतमाळ येथे आठवड्याच्या सरासरीच्या तीव्र अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे. मुंबई शहर, सातारा, सांगली, हिंगोली, अमरावती, अकोला, नागपूर, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मात्र पावसाची तूट आहे. पुणे, नंदूरबार आणि वर्धा येथे पाऊस सरासरीच्या श्रेणीत आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात विदर्भवगळता बहुतांश ठिकाणी समाधानकारक पाऊस असल्याचे दिसत आहे. मात्र अजूनही शेतकरी हा पाऊस पेरणीयोग्य नसल्याचे सांगत आहेत. विदर्भामध्ये मोठ्या पावसाची अजूनही गरज असल्याचे आकडीवरून स्पष्ट होत आहे.पुण्यातील हवामान संशोधन आणि सेवा विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी सोशल मीडियावरून दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या चार ते पाच दिवसांमध्ये कोकणातील पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. या काळात मध्यम सरी पडतील. शनिवारी प्रादेशिक हवामान विभागाने जारी केलेल्या पूर्वानुमानुसार रविवारनंतर पालघर, ठाणे जिल्ह्यासह मुंबईमध्ये हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. तर सोमवारनंतर दक्षिण कोकण म्हणजे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील पावसाचा जोरही कमी होऊ शकतो. विदर्भामध्ये मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात येत्या आठवड्यात पावसाचा जोर फारसा नसेल, अशी शक्यता आहे. प्रादेशिक पूर्वानुमानुसार बुधवारपर्यंतच्या पाच दिवसांमध्ये कोकण विभागामध्ये सर्वदूर पाऊस असेल तर राज्याच्या उर्वरित भागात तुरळक किंवा क्वचित ठिकाणीच पावसाची शक्यता आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/gEulros

No comments:

Post a Comment