Breaking

Saturday, July 8, 2023

महरषटरच अदत ठरल जगजजत जगतक तरदज सपरधत पटकवल वजतपद https://ift.tt/K9PQaS2

लिमेरिक (आयर्लंड) : महाराष्ट्राच्या अदिती स्वामीने आता एक नवा इतिहास लिहिला आहे, कारण अदितीने जागतिक तिरंदाजी स्पर्धेत विजेतेपद मिळवले आहे. त्यामुळे जगभरात भारतासह महाराष्ट्राचे नाव आता अदितीने उंचावले आहे.अवघ्या तीन आठवड्यांपूर्वी महाराष्ट्राच्या अदिती स्वामीने वर्ल्ड कप तिरंदाजी स्पर्धेत १८ वर्षांखालील गटातील जागतिक विक्रम केला होता. आता साताऱ्याच्या या तिरंदाजाने शनिवारी जागतिक ज्युनियर तिरंदाजी स्पर्धेत कम्पाउंड प्रकारात १८ वर्षांखालील गटात विजेतेपद जिंकले. अदितीने गेल्याच महिन्यात झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत ७११ गुणांचा जागतिक विक्रम केला होता. तिने जागतिक ज्युनियर स्पर्धेत त्यापेक्षा सरस कामगिरी करताना विजेतेपद जिंकले. तिने अमेरिकेच्या लीन ड्रेक हिला १४२-१३६ असे पराभूत केले. अदितीने या सामन्यात दोन फैरीनंतर पाच गुणांची आघाडी घेऊन विजेतेपद निश्चित केले होते. तिने उत्तरार्धात प्रतिस्पर्धीचा प्रतिकार रोखून यश निश्चित केले.अदितीने गेल्याच महिन्यात मॅडेलिन (कोलंबिया) वर्ल्ड कप स्पर्धेत वरिष्ठ गटात पदार्पण केले होते. तिने त्या वेळी सांघिक ब्राँझ दक जिंकले होते. आता तिने जागतिक ज्युनियर स्पर्धेतील भारताचे चौथे सुवर्णपदक जिंकले. भारताने या स्पर्धेत आतापर्यंत एक रौप्य आणि तीन ब्राँझपदकेही जिंकली आहेत. भारतास २१ वर्षांखालील गटात पुरुष एकेरीत सुवर्णपदक आणि महिला एकेरीत ब्राँझ जिंकण्याची संधी आहे. प्रियांश आणि अवनीत कौर यांच्याकडून ही अपेक्षा आहे.अदितीने पहिल्या दोन प्रयत्नात दहा गुणांची अचूकता साधली. मात्र प्रतिस्पर्धीनेही ही कामगिरी केली. त्यामुळे पहिल्या पाच प्रयत्नानंतर ४८-४८ अशी बरोबरी होती. सहाव्या प्रयत्नात अदितीने ९-८ असे वर्चस्व राखले. त्यामुळे तिने प्रथमच सामन्यात आघाडी घेतली. त्यानंतरही चुरस कायम होती. नऊ प्रयत्नानंतर अदितीची आघाडी ८६-८५ अशी झाली. त्यानंतरच्या तीन प्रयत्नात अचूकता साधत तिने ११६-१११ असे वर्चस्व राखले. हाच फरक तिने अखेरपर्यंत कायम राखला. तिने एकूण १५ प्रयत्नात नऊ वेळा दहा तर सहावेळा नऊ गुण मिळवले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/0KGnpk9

No comments:

Post a Comment