Breaking

Sunday, July 2, 2023

गरब कटबतन आलल करयकरत अजतददच नषठवन दनद मतरपद कण आह सजय बनसड? https://ift.tt/kmOP5tp

लातूर : अजित पवार यांचे निकटवर्तीय निष्ठावान असलेले आमदार संजय बनसोडे यांना मंत्रीपदाच्या माध्यमातून पोच-पावतीही मिळाली. अतिशय गरीब कुटुंबातून आलेल्या संजय बनसोडे हे मंत्री झाल्याने सध्या त्यांची जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीचे आमदार संजय बनसोडे हे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत उदगीर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार डॉ. अनिल कांबळे यांचा पराभव करून २० हजार मतांच्या फरकाने निवडून आले अन् आमदार झाले. पण महाविकास आघाडीकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने भाजप शिवसेनेचे सरकार स्थापन होणार यात शंका नव्हती. मात्र राजकीय सारीपाटाचा डाव उलटला अन् भाजपचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी हात मिळवणी करत अजित पवार यांनी पहाटे उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी उरकला. अजित पवार यांनी त्यावेळी केलेल्या बंडात आमदार संजय बनसोडे सहभागी होते. मात्र अजित पवार यांनी घुमजाव केले अन् त्यांच्या सोबत बंडात सहभागी झाले असतानाही महाविकास आघाडी सरकारमध्ये आमदार संजय बनसोडे यांची मंत्रीपदी वर्णी लागली. ते महाराष्ट्राचे पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्य या विभागांचे राज्यमंत्री झाले. दरम्यान, मध्यंतरी पुन्हा सत्तांतर झाले आणि भाजप-शिवसेना (शिंदे गट) सत्तेवर आले. आता त्यात राष्ट्रवादीच्या अजित पवार यांची भर पडली. त्यांच्या सोबत निष्ठावान म्हणून आमदार संजय बनसोडे यांनीही पुन्हा बंड केले अन् अजित पवार यांच्या सोबत गेले. त्यामुळे त्यांची पुन्हा मंत्रीपदी वर्णी लागली. राज्याच्या राजकीय सारीपाटात उलथापालथी करत आपले नशीब आजमावणारे अनेक मातब्बर नेते प्रयत्न करत असताना पहिल्यांदाच आमदार झालेल्या संजय बनसोडे यांची मात्र सत्तांतर झाल्यानंतरही दोनदा मंत्रीपदी वर्णी लागली. त्यामुळे आमदार संजय बनसोडे यांचे तारे बुलंद असल्याचेच मानले जात आहे. आमदार संजय बनसोडे यांचा हा राजकीय प्रवास इतका सहज नव्हता. त्यांनी अगदी भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेतून राजकीय वाटचाल सुरू केली. त्यांनतर १९९२ ला त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अशी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली. नामांतर चळवळीमध्येही संजय बनसोडे यांनी शरद पवार यांच्यासोबत मराठवाड्याचा दौरा केला. १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली अन् लातूर जिल्हा कार्याध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. त्यानंतर त्यांनी अनेक वर्षे प्रदेश सरचिटणीस म्हणूनही काम केले. महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. आमदारकीची स्वप्न पाहणाऱ्या संजय बनसोडे यांचा २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत निसटता पराभव झाला. त्यांनतर मात्र त्यांनी उदगीर मतदारसंघात नव्या उमेदीने सतत पाच वर्षे कामाचा सपाटा लावला अन् संघटनात्मकदृष्ट्या भाजपचा गड असणाऱ्या उदगीर विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार डॉ. अनिल कांबळे यांचा पराभव केला. आता जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अन्य दोन आमदार आहेत. तर भाजपचे तीन आमदार आहेत. पैकी एक माजी मंत्री अन् एक उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे माजी स्विय सहायक निकटवर्तीय आहेत. त्यामुळे केवळ जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात मंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू असताना आमदार संजय बनसोडे यांची राजकीय उलथापालथीमध्येही दोनदा मंत्रीपदी वर्णी लागली आहे. त्यामुळे संजय बनसोडे सध्या चर्चेत आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/SnCyzpL

No comments:

Post a Comment