Breaking

Monday, July 3, 2023

भजपच महरषटरनतर पढल ऑपरशन लटस बहरमधयकदरय मतरयच सकत नतशकमरन धड शकवणर? https://ift.tt/WIMgSEs

म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : महाराष्ट्रातील ताज्या ‘ऑपरेशन कमळ’नंतर भाजप नेतृत्वाच्या अजेंड्यावर पुढचा क्रमांक बिहारचाच असणार, असे भाजप नेते व मंत्री उघडपणे बोलत आहेत. ‘संयुक्त जनता दलाचे अनेक आमदार आणि खासदार भाजप नेत्यांच्या थेट संपर्कात आहेत,’ असा दावा ज्येष्ठ भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांनी सोमवारी केल्यानंतर नितीशकुमार यांच्या पक्षात फूट पडण्याच्या चर्चेने पुन्हा जोर धरला आहे.‘नितीशकुमार यांना पुन्हा ‘रालोआ’मध्ये घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि त्यांनी भाजपच्या दारावर नाक घासले तरी त्यांना आमच्या आघाडीत घेणार नाही,’ अशी कटू भावनाही मोदी यांनी व्यक्त केली. सुशीलकुमार बिहारमध्ये अनेक वर्षे नितीशकुमार मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री होते हे लक्षात घेतल्यास भाजप नेतृत्वाशी नितीशकुमार यांचे किती बिनसले आहे याची स्पष्ट कल्पना येते.‘नितीश यांनी १७ वर्षांत एकाही आमदार किंवा खासदाराला भेटण्यासाठी एक मिनिटाचाही वेळ दिला नव्हता. आता गळ्याशी आल्यावर ते प्रत्येक आमदाराला अर्धा तास वेळ देत आहेत, पण त्याचा काही फायदा नाही. तेजस्वी यादव यांच्या दादागिरीला कंटाळेलेले ‘जेडीयू’चे अनेक आमदार-खासदार लवकरच भाजपची वाट धरतील व बिहार सरकार कोसळेल,’ असा दावा केंद्रीय मंत्री पशुपती पारस यांनीही केला.भाजपच्या दृष्टीने सन २०२४च्या लोकसभा निवडणुकीसाठी बिहारचे महत्त्व मोठे आहे. ४० जागांच्या या राज्याने २०१९मध्ये नितीश यांच्या साथीने याच बिहारमधून ४०पैकी ३९ खासदार निवडून आणले होते. सद्यस्थितीत त्या यशाची पुनरावृत्ती अशक्य दिसत असली तरी संभाव्य ‘ऑपरेशन कमळ’नंतर ते शक्य होईल, असा विश्वास भाजप नेत्यांना वाटतो आहे.

भाकरी फिरवणार...

भाजप अनेक राज्यांतील प्रदेशाध्यक्ष बदलणार आहे. जी. किशन रेड्डी यांना तेलंगण, पंजाबात सुनील जाखड, अश्वथ नारायण किंवा शोभा करंदलाजे यांना कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष बनवले जाऊ शकते. मध्य प्रदेशातही निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल किंवा नरोत्तम मिश्रा यांच्या नावांची चर्चा आहे.नितीशकुमार यांना पुन्हा एनडीएमध्ये घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि त्यांनी भाजपच्या दारावर नाक घासले तरी त्यांना आमच्या आघाडीत घेणार नाही, असं सुशीलकुमार मोदी म्हणाले.तेजस्वी यादव यांच्या दादागिरीला कंटाळेलेले ‘जेडीयू’चे अनेक आमदार-खासदार लवकरच भाजपची वाट धरतील व बिहार सरकार कोसळेल, असं पशुपती पारस म्हणाले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/oHgqOpr

No comments:

Post a Comment