मुंबई : पावसाळ्याची खऱ्या अर्थाने सुरुवात झाल्यानंतर मुंबईसह राज्यामध्ये आजारांचा प्रादुर्भावही वाढला आहे. सर्दी, ताप, खोकला, डोकेदुखी, घसादुखी या तीव्र लक्षणांसह स्वाइन फ्लूच्या रुग्णसंख्येमध्ये राज्यात हळूहळू वाढ होत आहे. एच१एन१पेक्षा एच३एन२च्या रुग्णसंख्येची अधिक नोंद झालेली दिसते. करोनाबाधितांची शून्य नोंद होत असताना मुंबईमध्ये इतर आजारांचा प्रादुर्भाव वाढताना दिसतो.करोनाच्या संसर्गापूर्वी स्वाइन फ्लू म्हणजे एच१एन१चा संसर्ग अधिक होता. त्यानंतर एच३एन२चा संसर्ग बळावला आहे. या विषाणूच्या प्रसारासाठी त्या स्वरूपाचे पोषक वातावरण असल्यामुळे रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे डॉक्टर सांगतात. ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णांमध्ये एकाच कुटुंबातील अनेकजणांचा समावेश आहे. त्यामुळे एच३एन२ या विषाणूची संसर्गक्षमता अधिक असल्याचे दिसून येते. थंडी पावसाळा या तुलनेने तापमान कमी असलेल्या दिवसांमध्ये या विषाणूचा संसर्ग अधिक असल्याचे दिसते. सर्दी, घसादुखी, अंगदुखी आणि शरिरातील प्लेटलेट कमी होणे, तीव्र स्वरूपाचा ताप ही लक्षणे या रुग्णांमध्ये दिसून येतात.डेंग्यू, मलेरियाच्या चाचण्या निगेटिव्हएच१एन१ किंवा एच३एन२ या चाचण्या रुग्ण त्वरित करत नाही. डेंग्यू, मलेरिया तसेच व्हायरल तापाची साथीची तीन दिवसांची मुदत उलटून गेल्यानंतर या चाचण्या केल्या जातात. करोना संसर्गानंतर या स्वरूपाच्या विषाणूचा प्रादुर्भाव वाढताना दिसतो, याकडे डॉ. दीपक बैद लक्ष वेधतात. काही रुग्णांमध्ये प्लेटलेटची संख्या कमी होते. मात्र व्हेन्टिलेटवर टाकण्याची वेळ येत नाही. पुरेशी काळजी, औषधोपचारांनी रुग्ण बरे होतात. त्यामुळे कुणीही घाबरून जाऊ नये, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.असे आहे राज्यातील चित्र१ जुलै ते ३० जुलै या कालावधीमध्येएच१एन१ - १३१ रुग्णसंख्या- मृत्यू नाहीएच३एन२- ३४८ रुग्णसंख्या - मृत्यू नाहीएकूण - ४७९१२ जणांनी जीव गमावला१ जानेवारी ते ३० जून २०२३ या कालावधीमध्ये एच१एन१च्या ५४५ तर एच३एन२च्या ५७४ रुग्णसंख्येची नोंद झाली होती. या कालावधीत दोन्ही प्रकारच्या इन्फ्लूएन्झाने १२ जणांचा मृत्यू झाला आहे.लक्षणेहा आजार विषाणूमुळे होणारा आजारएच१एन१, एच२एन२, एच३एन२ हे उपप्रकारताप, खोकला, घशात खवखव, धाप लागणे, न्यूमोनिया ही लक्षणेलक्षणाधारित रुग्ण सर्वेक्षण व उपचारपद्धतीही त्यावर आधारित.राज्यातील संशयित रुग्ण- ८,६९,२५२ऑसेलटॅमीवीर दिलेले संशयित फ्लू रुग्ण- ६०४५बाधित रुग्णसंख्या - १,५९८रुग्णालयात दाखल रुग्ण - १०५मृत्यू -१२ ( दोन्ही प्रकार)पोटदुखी, ताप, उलट्यांचा त्रासमुलांमध्येही पोटदुखी, ताप आणि उलट्यांचा त्रास बळावला आहे. व्हायरल तापाच्या तक्रारी लहान मुलांमध्ये दिसून येत असून प्रत्येक पावसाळ्यामध्ये त्या दिसून येतात. मोठ्यांप्रमाणे लहान मुलांमध्ये डोळे लाल होणे, डोळ्यातून पाणी येणे, सूज येण्यासारख्या तक्रारी दिसतात. काही मुलांना त्यानंतर तापही येतो. ही लक्षणे दिसताच वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/CsrfJXG
No comments:
Post a Comment