Breaking

Sunday, July 23, 2023

चुकूनही विकेंडला लोणावळा जाऊ नका, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील VIDEO पोस्ट करत व्यक्तीने दिला सल्ला https://ift.tt/ExOV87p

लोणावळा: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील ४१ मुंबई लेनवर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झालेली असून पुण्यावरुन मुंबईला जाणाऱ्या तीन लेन बंद झालेल्या आहेत. सध्या एक्स्प्रेस वेवरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळली असून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.या दुर्घटनेनंतर मुंबईच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. रविवार असल्याने अनेकजण विकेंडला लोणावळा-खंडाळा फिरायला गेले होते. मात्र, मुंबईला परत येताना त्यांना मोठ्या ट्राफीक जामचा सामना करावा लागला आहे. यावेळी एका व्यक्तीने ट्वीटरवर एक्स्प्रेस वेवरील व्हिडिओ शेअर करत तिथली सध्याची परिस्थिती सांगितली आहे. अनेकजळ सांगतात की विकेंडला लोणावळा जाऊ नका, ट्राफीकमध्ये अडकाल आणि ते खरं झालं आहे, असं ही व्यक्ती या व्हिडिओमध्ये म्हणते आहे. दरड कोसळ्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्पपुणे जिल्ह्यातील लोणावळा भागात पावसाचा सर्वात जास्त जोर आहे. विक्रमी पावसाची नोंद या भागात नोंदवली जात आहे. मात्र, आता उशिरा ही दरड कोसळल्याने या मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. पोलिसांकडून दरड काढण्याचे काम सुरू असून पावसामुळे अनेक अडथळे निर्माण होत आहे. नेमकं काय घडलं?मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर साधारण दहा ते साडेदहाच्या सुमारास ही दरड कोसळल्याची घटना घडली आहे. त्यामुळे तीनही लेनवरची वाहतूक ठप्प झाली आहे. ओडोसी बोगद्याजवळ दरड कोसळली आहे. पुण्यावरुन मुंबईला जाणाऱ्या तीन लेन यामुळे बंद झाल्या आहेत. महामार्ग वाहतूक यंत्रणेच्या वतीने मार्गिका बदलण्याचं काम सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/xCHUIMg

No comments:

Post a Comment