विजयवाडा: पहिल्या पत्नीचे रील्स पाहाणे एका पतीला चांगलंच महागात पडलं आहे. पती पहिल्या पत्नीचे रील्स पाहातो ते कळल्यावर दुसरी पत्नी इतकी भडकली की तिने पतीचे गुप्तांगच छाटलं. ही घटना आंध्र प्रदेशातील एनटीआर जिल्ह्यातील आहे. येथील नंदीगामा मंडळाच्या मुप्पाला गावात महिलेने पतीला त्याच्या पहिल्या पत्नीचे इंस्टाग्राम रील पाहताना पकडले. यानंतर दोघांमध्ये जोरदार भांडण आणि हाणामारी झाली. महिलेला राग आला आणि तिने ब्लेड उचलले आणि पतीचे गुप्तांग कापले. पतीने आरडाओरडा केल्यानंतर कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी स्थानिक सरकारी रुग्णालयात आणि नंतर विजयवाडा जीजीएचमध्ये नेले, जिथे डॉक्टरांनी त्याचे गुप्तांगावर टाके लावले. आता त्याची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोटा आनंद बाबू (वय - २६) याचा सहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. मात्र, वारंवार होणाऱ्या भांडणामुळे ते पत्नीपासून वेगळे झाले. चार वर्षांपूर्वी त्यांनी वरम्मा (वय -२५) यांच्याशी लग्न केले. हे जोडपं मुपल्ला गावात राहतं आणि रोजंदारीवर काम करून उदरनिर्वाह करतात. शनिवारी पहाटे जेव्हा वरम्माने आनंद बाबूला त्याच्या पहिल्या पत्नीचे इंस्टाग्राम रील्स पाहताना पाहिले तेव्हा तिला खूप राग आला. या भांडणात पत्नी इतकी संतापली की तिने पतीचे गुप्तांग ब्लेडने कापले, त्यामुळे आनंद बाबू जमिनीवर कोसळला आणि जोरजोरात ओरडू लागला.गुप्तांगावर गंभीर जखमामोठ्या वादानंतर दोघांनी एकमेकांना मारहाण केली. त्यानंतर संतप्त झालेल्या वरम्माने आनंदवर ब्लेडने वार करून त्यांचे गुप्तांग छाटलं. आनंदचा आरडाओरड ऐकून स्थानिक लोक त्याच्या घरी पोहोचले आणि तेव्हा त्यांना आनंद रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आले. कुटुंबीयांनी त्यांना प्रथम नंदीगामा शासकीय रुग्णालयात दाखल केले, त्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी विजयवाडा येथे हलविण्यात आले. आनंदवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले की, पीडित व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टवर खोल जखमा होत्या. सध्या उपचार केल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/vk6xTFC
No comments:
Post a Comment