Breaking

Thursday, August 17, 2023

मोदी-शहांची अडीच वाजता बैठक, शिंदे गट-भाजपात वाद, दोन CM फोनवर, उमेदवारांची पहिली यादी तयार https://ift.tt/lwKCevS

म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : तिकीटवाटपात घोळ घातला गेला तर निवडणुकीत त्याचा थेट फटका बसतो... हा धडा कर्नाटकात मिळालेल्या भाजपने आगामी पाच राज्यांच्या निवडणुकांसाठी आपल्या याबाबतच्या रणनीतीत मोठा बदल केला आहे. विशेषतः मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील भाजपचे उमेदवार निवडणुकीची तारीख जाहीर होण्यापूर्वीच निश्चित करून भाजपने काँग्रेसवर पहिल्या टप्प्यात आघाडी घेतली आहे. त्यातही यापूर्वी गमावलेल्या बहुतांश जागांवरील उमेदवार सर्वप्रथम निश्चित करून अत्यंत आक्रमक भूमिका घेणाऱ्या भाजपने राजकीय विरोधकांना चकवा दिल्याचे मानले जाते.शिंदे गट-भाजपात वादमध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे गटाच्या आमदारांच्या जागांचा समावेश टाळण्यात आला आहे. तिथे शिंदे गट आणि भाजपमधील निष्ठावंत यांच्यात मोठा वाद सुरू असल्याची माहिती आहे. कोणत्याही निवडणुकीच्या तीन-चार महिने आधीपासून उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याची भाजपची ही पहिलीच वेळ आहे. दिल्लीत बुधवारी संध्याकाळपासून मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या (सीईसी) बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी आणखी एक बैठक घेऊन रात्री सुमारे अडीचपर्यंत चर्चा केली. संघटनमंत्री बी. एल. संतोष आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत ही दुसरी बैठक सुमारे तासभर चालली. या बैठकीतच दोन्ही राज्यांची पहिली उमेदवारी यादी अंतिम झाली. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान व छत्तीसगडचे डॉ. रमण सिंह यांना भ्रमणध्वनीवर तत्काळ उपलब्ध राहण्याच्या सूचनाही दिल्या गेल्या होत्या, असे सूत्रांनी ‘मटा’ला सांगितलेमतदारसंघनिहाय चार गटभाजपने आपल्या नेहमीच्या सूत्रानुसार दोन्ही राज्यांतील विधानसभा जागा चार गटांमध्ये विभागल्या आहेत. ‘अ’ गटातील जागांवर मजबूत आहे. ‘ब’ गटातील जागांवर भाजप फक्त एक-दोनदा पराभूत झाला आहे. ‘क’ गटातील जागांवर पक्ष सलग दोन वेळा पराभूत झाला आहे, तर भाजपला कधीही विजय मिळाला नाही अशा जागा ‘ड’ गटात आहेत. अखेरच्या दोन गटांवर विशेष लक्ष केंद्रित करायचे म्हणजे नेमके काय करायचे, याच्या सूचना सर्वेसर्वा नेतृत्वाकडून ‘सीईसी’ बैठकीत देण्यात आल्याचे समजते. सूत्रांच्या माहितीनुसार, ‘सीईसी’ बैठकीपूर्वी मध्य प्रदेशातील कोअर गटाच्या नेत्यांची बैठकही शहा यांच्यासोबत झाली. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या गटाच्या आमदारांच्या जागांचा समावेश सीईसीच्या कालच्या चर्चेत करू नये या शिंदेंच्याच विनंतीवरून अशा जागांवरील चर्चा थांबवण्यात आली. वसुंधरा राजे पुन्हा ‘बाहेर’राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने गुरुवारी राज्य निवडणूक व्यवस्थापन आणि जाहीरनामा समित्याही स्थापन केल्या. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना कोणत्याही समितीत स्थान न दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. प्रदेश प्रभारी अरुण सिंह, प्रदेशाध्यक्ष सी. पी. जोशी यांच्या उपस्थितीत भाजपच्या समित्यांची घोषणा झाली. प्रदेश उपाध्यक्ष नारायण पंचारिया यांना निवडणूक व्यवस्थापन समिती आणि केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांना जाहीरनामा समितीचे निमंत्रक बनवण्यात आले आहे. वसुंधरा राजे यांच्यासह पक्षाचे सारे ज्येष्ठ नेते प्रचारात सक्रिय असतील, असे गुळमुळीत उत्तर भाजपच्या वतीने देण्यात आले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/A5SiMjn

No comments:

Post a Comment