Breaking

Thursday, August 17, 2023

गुंतवणुकीचे फुकट सल्ले देणाऱ्या ‘इंफ्लुएंसर्स’चा बाजार उठणार, ASCI कडून नवीन नियमावली जारी https://ift.tt/17OPqmS

मुंबई : सोशल मीडियावर आर्थिक सल्ले देणारे इंफ्लुएंसर्स किंवा साठी मोठी बातमी आहे. गेल्या काही काळापासून (भारतीय जाहिरात मानक परिषद) मार्केट रेगुलेटर सोबत मिळून इंफ्लुएंसर्सच्या कंटेटवर बारकाईने लक्ष ठेवून असून याबाबत सातत्याने मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात येत असताना आता ASCI ने याबाबत काही नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.कोणतीही आर्थिक माहिती नसताना इंटरनेटवर लोकांना गुंतवणुकीचा सल्ला देणे - शेअर बाजारात पैसे गुंतवून खात्रीशीर परताव्याची हमी देणारे किंवा क्रिप्टोमध्ये पैसे गुंतवण्याचे किंवा पैसे घेऊन कोणतेही आर्थिक उत्पादन खरेदी करण्यासाठी फायदेशीर करार सांगणार्‍या Finfluencers वर सरकार बारीक लक्ष ठेवून आहे. अशा फसवणूक करणाऱ्या आर्थिक प्रभावांवर कारवाई करण्यासाठी ASCI ने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.Finfluencers साठी ASCI ची नवीन मार्गदर्शक तत्त्वे१. जर एखादा इंफ्लुएंसर BFSI space म्हणजे बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा क्षेत्रात सामग्री तयार करत असेल, तर तसा कंटेन्ट तयार करण्याची त्याच्याकडे मान्यता असली पाहिजे.२. तसेच किंवा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत असल्यास त्याच्याकडे नोंदणी क्रमांक असावा आणि तो क्रमांक त्याच्या नावावर आणि पात्रतेमध्ये दिसला पाहिजे.३. जर तुम्ही फायनान्स बद्दल सल्ला देत असाल, तर सीए, सीएस इत्यादींशी संबंधित पात्रता असणे आवश्यक आहे.४. विमा पॉलिसी विकत असल्यास तुमच्याकडे द्वारे दिलेला परवाना असणे आवश्यक आहे.५. आर्थिक नियामकांनी ठरवलेल्या कंटेन्टमध्ये जोखमीचे संपूर्ण प्रकटीकरण असावे.६. वित्त क्षेत्रात तयार केलेल्या प्रत्येक सामग्रीमध्ये, प्रभावशाली व्यक्तीने त्याचा नोंदणी क्रमांक किंवा ओळख नमूद करणे आवश्यक आहे, जसे की:- जर पॉडकास्ट असेल तर पॉडकास्टच्या सुरुवातीला ही माहिती सांगणे आवश्यक आहे.- व्हिडिओ असल्यास व्हिडिओच्या सुरुवातीच्या टिप्पण्यांमध्ये माहिती सांगणे आवश्यक आहे.- जर ब्लॉग असेल, तर ही माहिती वाचकांसाठी अगदी सुरुवातीला असावी.- ही माहिती व्हिडिओ किंवा फोटोमध्ये देखील सुपरइम्पोज केली जाऊ शकते.दरम्यान, ASCI ने मार्गदर्शक तत्त्वांमध्ये आधीच सांगितले आहे की AD किंवा जाहिरात शब्द वापरून पैसे भरलेल्या प्रत्येक कंटेन्टला हे सांगणे आवश्यक आहे की हा कंटेन्ट ऑरगॅनिक नाही.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/jMQ5rT4

No comments:

Post a Comment