Breaking

Wednesday, August 23, 2023

जूनमध्ये उठाव पुतीनचं टेन्शन वाढवलं, वॅगनर ग्रुपच्या येवगेनी प्रिगोझिनच्या मृत्यूची शक्यता, विमान दुर्घटनेत... https://ift.tt/CLo1HWb

मॉस्को : रशियात बुधवारी एक विमान दुर्घटना घडली आहे. या घटनेत १० जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ही दुर्घटना मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्ग दरम्यान झाली. धक्कादायक, काही या विमानातून प्रवास करणाऱ्यांमध्ये रशियातील खासगी सैन्य वॅगनर ग्रुपचा प्रमुख याचा समावेश होता.प्राथमिक माहितीनुसार रशियाचे अध्यक्ष यांच्या विरोधात सशस्त्र बंड करणाऱ्या येवगेनी प्रिगोझिनचा या विमान अपघातात मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे. या विमानात ३ केबिन क्रूसह १० जण होते. रशियाच्या आपत्कालीन मंत्रालयानं या घटनेला दुजोरा दिलेला आहे. फायनान्शिअल टाइम्सच्या वृत्तानुसार रशियाच्या अधिकाऱ्यांनी त्या विमानात प्रिगोझिन नावाचा व्यक्ती प्रवास करत होता, असं सांगितलं आहे. मात्र, त्यांनी संबंधित व्यक्ती येवगेनी प्रिगोझिन असल्यासंदर्भात त्यांनी पुष्टी केलेली नाही. रशिया युक्रेन युद्धात वॅगनर ग्रुपचं सैन्य रशियाकडून लढत होतं. काही दिवसांपूर्वी म्हणजेच दोन महिन्यांपूर्वी वॅगनर ग्रुपनं रशियाविरुद्ध बंड पुकारलं होतं. येवगेनी प्रिगोझिन यांनी काही दिवसांपूर्वी टेलिग्रावर व्हिडिओ शेअर केला होता. तो व्हिडिओ ऑफ्रिकेत बनवला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. ते एका वाळवंटात सैन्यदलाच्या गणवेशात होते. त्यांच्या हतात एक रायफल होती. तर, जून महिन्यात त्यांनी रशिया विरोधात उठाव केला होता. तो २४ तासात संपला होता.

घातपाचा संशय

बीबीसीच्या रिपोर्टनुसार वॅगनर ग्रुपशी संबंधित टेलिग्राम चॅनेल ग्रे जोननं एम्ब्रेयर विमानाला मॉस्कोच्या उत्तर भागात हवाई दलांनी पाडल्याचा दावा करण्यात आला. स्थानिक लोकांनी दुर्घटनेच्या अगोदर दोन मोठे आवाज ऐकले होते. तर, टासच्या रिपोर्टनुसार विमान जमिनीवर पडताच आग लागली होती.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/qwo84E5

No comments:

Post a Comment