Breaking

Tuesday, August 22, 2023

थेरगाव क्विननंतर हडपसरच्या बादशाहचा पोलिसांकडून करेक्ट कार्यक्रम, रिल्समधून आव्हान देणं भोवलं, अशी अद्दल की... https://ift.tt/n7tMDNm

पुणे: पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी डोकं वर काढत आहे. त्यातच सोशल मीडियाचा वापर देखील गुन्हेगारीसाठी होत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. पुण्यातील हडपसर परिसरातील एका २० वर्षीय तरुणाने एक रील्स तयार करून पोलिसांना आव्हान देत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. मात्र यानंतर पोलिसांनी पाऊले उचलत थेट त्या तरुणाला ताब्यात घेतले. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट ६ ने ही कारवाई केली आहे. याशिवाय पोलिसांनी व्हिडिओ मधूनच त्याच्याकडून माफीनामा तयार करून घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पवन संतोष भारती (२०) असे रील्स तयार करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. याने बादशहा नावाने रील्स बनवून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. पोलिसांकडून याचा शोध घेण्याचे काम सुरू होते. पवन भरातीबद्दल पोलिसांना माहिती मिळाली होती की, पवन हा हडपसर परिसरात असणाऱ्या इंडस्ट्रियल एरियात थांबला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याला ताब्यात घेतले. त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे हत्यार सापडले. त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून व्हिडिओद्वारे माफीनामा तयार करून घेतला. तसेच यापुढे अशी चूक करणार नाही, असे त्याने या माफीनाम्यात म्हटले आहे. सोशल मिडीयावर अशा प्रकारचे व्हिडिओ टाकणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात येणार असून सोशल मीडियावर व्हिडिओ टाकताना काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. पुण्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलिसांकडून योग्य त्या उपाययोजना करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे गुन्हेगारांना आळा बसवण्यासाठी पोलिसांनी पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/tFIpiW2

No comments:

Post a Comment