Breaking

Monday, August 21, 2023

जय हो... जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारताची सुवर्णपदकाला गवसणी https://ift.tt/nG18w0P

बाकू : भारतीय नेमबाजांनी जागतिक स्पर्धेत रविवारी दोन सुवर्ण आणि एका ब्राँझपदकाचा वेध घेतला. त्यातही अखिल शेरॉनने ५० मीटर रायफल थ्री पोझीशन स्पर्धेत मिळवलेला ऑलिम्पिक कोटा भारतासाठी मोलाचा आहे. या प्रकारातील भारताय नेमबाजांचा हा दुसरा कोटा आहे. गतवर्षी स्वप्नील कुसळेने ही कामगिरी केली आहे. ऱ्हिदम सांगवान मोक्याच्या वेळी कामगिरी उंचावू न शकल्याने तिचे २५ मीटर पिस्तूल स्पर्धेतील पदक आणि ऑलिम्पिक कोटा हुकला. भारताच्या नेमबाजीतील ऑलिम्पिक कोट्याची संख्या पाच झाली आहे.अखिलने वैयक्तिक ब्राँझ जिंकण्यापूर्वी ऐश्वर्य प्रतापसिंग तोमर आणि नीरजकुमारच्या साथीत भारताला ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारातील सांघिक सुवर्णपदक जिंकून दिले. त्यांनी एकूण १७५० गुणांचा वेध घेतला. ऱ्हिदम, मनू भाकेर आणि ईशा सिंगने २५ मीटर पिस्तूलच्या सांघिक स्पर्धेत भारताला विजेते केले. त्यांनी १७४४ गुण मिळवताना तैवानला एक गुणाने मागे टाकले. चीनला ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले.अखिलचे ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारातील यश धक्कादायक आहे. त्याने ४५०.० गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकावला. प्राथमिक फेरीतून तो आगेकूच केलेल्या भारतीय नेमबाजांतही ५७९ गुणांसह तिसरा होता. त्या वेळी ऐश्वर्यने ५८७ आणि नीरजने ५८४ गुण मिळवले होते. मात्र, पात्रता फेरीत त्याने ५८५ गुणांसह सहावा क्रमांक मिळवले. त्या वेळी त्याने प्रोनमध्ये २०० पैकी १९८ गुण मिळवले होते. ऐश्वर्य (१३ - ५८३) आणि नीरज (५७७) अंतिम फेरीपासून दूर राहिले.ऱ्हिदमकडून निराशाप्राथमिक फेरीत मोक्याच्या वेळी २३वेळा अचूकता साधून ऱ्हिदमने अंतिम फेरी गाठली होती. तिला ऑलिम्पिक पात्रतेसाठी अव्वल पाच जणींत येण्याची गरज होती. मात्र, तिला आठव्या क्रमांकावरच समाधान मानावे लागले. " ऑलिम्पिक कोटा माझ्यासाठी खूपच मोलाचा आहे. कित्येक वर्षे मी जागतिक पदक तसेच ऑलिम्पिक कोटा मिळवण्यासाठी प्रयत्नशील होतो. हे दोन्ही साधल्याचे समाधान आहे. रौप्यपदक जिंकण्याची मला संधी होती. मात्र ती साधू शकलो नाही याचे दुःख नक्कीच आहे, " असे अखिल शेरॉनने सांगितले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/hQWmp9c

No comments:

Post a Comment