रायगड: मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील एक लेन ही गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करण्यासाठी यांनी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. आज शनिवारी २६ ऑगस्ट रोजी पुन्हा त्यांनी रायगड जिल्ह्यात पळसपे येथे इंदापूर या मार्गाची पाहणी केली. या मार्गाचे काम जलद गतीने व्हावे तसेच वाहतूक कोंडी टाळावी यासाठी या पाहाणीनंतर त्यांनी मुंबई गोवा महामार्गावर होणाऱ्या वाहतुकीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. या महामार्गावर होणारी अवजड वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याची अंमलबजावणी २७ ऑगस्ट रोजी रविवारी संध्याकाळी सहा वाजल्यानंतर करण्यात येणार आहे, तसा आदेश प्रशासनाकडून रविवारी सकाळी जारी केला जाण्याची शक्यता आहे. या महामार्गाला पर्याय असलेल्या खालापूर या पर्याय रस्त्यावरून ही अवजड वाहतूक वळवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती चव्हाण यांनी दिली आहे. कोकणातल्या गणेशोत्सवानंतर आता ही अवजड वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती अवजड वाहतुकीमुळे कामाला मोठा विलंब होत आहे. ही गोष्ट आपल्या लक्षात आली आहे आणि म्हणूनच आपण सरकार म्हणून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या जवळ चर्चा करून हा महामार्ग जड वाहनांसाठी पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे निर्देश आपण रायगड जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाला दिले आहेत, अशी ही माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे.महामार्गावरील दोन तासापासून सुरु वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मंत्री रविंद्र चव्हाण यांनी घेतला पुढाकार मुंबई गोवा पाहणी दौरा सुरू असतानाच पेणजवळ हॉटेल साई सहारा जवळ एक एसटी बंद पडल्यामुळे या मार्गावर सुमारे दोन ते अडीच तास वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक कोंडी सुटेना एसटी जागेवरच बंद पडल्यामुळे दोन्ही बाजूच्या मार्गिकेवरील गाड्या तब्बल दोन तास अडकल्या होत्या. बंद एसटी बस जागेवरून काढण्याचे प्रयत्न सुरू होते अखेर सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण स्वतः रस्त्यावर उतरले व ते चालत होटल साई सहारापर्यंत गेले. त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी या वाहतूक कोंडीतून मार्ग काढत बंद एसटीला क्रेनच्या साह्याने बाजूला करण्यात आले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/xHGl8EZ
No comments:
Post a Comment