म. टा. प्रतिनिधी, मुंबई: ठाणे ते कल्याण आणि पनवेल ते वाशीदरम्यान मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेवर वसई रोड ते वैतरणादरम्यान शनिवारी मध्यरात्री ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे पश्चिम रेल्वेवर दिवसा कोणताही ब्लॉक असणार नाही. रेल्वेरुळांसह सिग्नलच्या देखभाल-दुरुस्तीसाठी रेल्वे प्रशासनाकडून ब्लॉक घोषित करण्यात येतो. ब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून काही विलंबाने धावणार आहेत.मध्य रेल्वे:स्थानक - ठाणे ते कल्याणमार्ग - अप आणि डाऊन जलदवेळ - सकाळी १०.४० ते दुपारी ३.४०परिणाम - ब्लॉकवेळेत अप आणि डाऊन जलद लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.हार्बर रेल्वे:स्थानक - पनवेल ते वाशीमार्ग - अप आणि डाऊनवेळ - सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५परिणाम - सीएसएमटी ते पनवेल/बेलापूर, ठाणे ते पनवेल, नेरूळ ते ठाणे, नेरूळ ते खारकोपरदरम्यान धावणाऱ्या अप आणि डाऊन लोकलफेऱ्या बंद राहणार आहेत. सीएसएमटी ते वाशी, ठाणे ते वाशी आणि बेलापूर ते खारकोपरदरम्यान लोकल फेऱ्या सुरू राहणार आहेत.पश्चिम रेल्वे:स्थानक - वसई रोड ते वैतरणामार्ग - अप आणि डाऊन जलदवेळ - शनिवारी रात्री ११.५० ते रविवार पहाटे ४.३०परिणाम - ब्लॉकमुळे रात्री उशिरा धावणाऱ्या काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत. विरार-भरूच मेमू रविवारी पहाटे ४.३५ऐवजी ४.५० वाजता विरार स्थानकातून रवाना होईल.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/dGBXZ73
No comments:
Post a Comment