Breaking

Wednesday, August 16, 2023

आईसोबत फेरफटका मारत होती तरुणी; अचानक अनोळखी तरुण आला, अन... धक्कादायक कृत्यानं खळबळ https://ift.tt/pXJwfxI

ठाणे: कल्याण पूर्वेकडील तिसगाव परिसरातील राहणारी अल्पवयीन तरुणी तिच्या आईसह घरात जात असताना एका तरुणाने तिच्यावर चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेनंतर आरोपीला संतप्त नागरिकांनी पकडून कोळसेवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. मात्र हल्ल्यामागचे कारण अद्याप समजू शकले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, तिसगाव परिसरात दुर्गादर्शन सोसायटीमध्ये राहणारी महिला तिच्या अल्पवयीन मुलीसह सोसायटीच्या आवारात रात्री ८ च्या सुमारास आली होती. अचानक एका अनोळखी तरुणाने त्या मुलीवर चाकूने ७ ते ८ वार केले. आई आणि मुलीचा आरडाओरडा ऐकून सोसायटीतील इतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत पळून जाण्याच्या प्रयत्न करणाऱ्या आरोपी आदित्य कांबळे याला पकडून कोळसेवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर फिनेल प्यायल्याने पोलिसांनी या आरोपीला केडीएमसीच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये दाखल केले. दरम्यान रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रणिता दास हिला केडीएमसीच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु तेथील डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. दरम्यान आरोपी आदित्य याने प्रणिताला कोणत्या कारणातून ठार केले, त्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/ZJe08Ij

No comments:

Post a Comment