नांदेड: चे बुधवारी सायंकाळी यशस्वी लैंडिंग झाले आहे. सर्व देशाचे लक्ष या चांद्रयान ३ मोहिमेकडे लागले होते. अखेर इस्त्रोची ही मोहीम यशस्वी झाली आहे. इस्त्रोच्या शास्त्रज्ञानी परिश्रम घेऊन मिशन फत्ते केलं आहे. या मिशनमध्ये नांदेडच्या तनुजा पत्कीचा देखील खारीचा वाटा राहिला असून नांदेडकरासाठी अभिमान आणि गौरवाची बाब बनली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तनुजा पत्की ह्या मूळ नांदेडच्या असून सायन्स महाविद्यालयाचे माजी प्राचार्य कैलासवासी कालिदास देशपांडे यांच्या त्या कन्या आहेत. तजुना यांचे बालपण नांदेड शहरातील विद्यानगर येथे गेलं. त्यांचं पहिली ते दहावी पर्यंतच शिक्षण पीपल्स हायस्कुलमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी अकरावी, बारावी हे सायन्स महाविद्यालयात पूर्ण केले. शिवाय श्री गुरुगोबिंदसिंघ जी इंजिनियरिंग कॉलेज मध्ये बी टेक आणि एम.टेक ची पदवी प्राप्त केली. लहानपणापासून त्या अभ्यासात खूप हुशार होत्या. त्यांचे वडील कै. कालिदास देशपांडे हे वनस्पती शास्त्र विषयाचे प्राध्यापक, शास्त्रज्ञ होते. त्यांच्या आई डॉ. उषा देशपांडे ह्या देखील सायन्स महाविद्यालयात प्राध्यापिका होत्या. या दोघांनी अनेक पिढ्या घडवल्या आहेत. घरातूच तनुजा यांना संशोधनाचे मिळाले आहे. तनुजा यांना शास्त्रज्ञ होण्याचं त्यांचं स्वप्न होत. जिद्दीच्या जोरावर आणि आई वडिलांच्या मार्गदर्शनाने त्या शास्त्रज्ञ देखील झाल्या. तनुजा यांचे बंधू राजस देशपांडे हे पुणे येथे न्युरोलोजिस्ट आहेत. अभिजीत पत्की यांच्याशी त्यांचा विवाह झाला आहे. तनुजा सद्या त्या बंगळूरु येथे इस्त्रोमध्ये शास्त्रज्ञ कार्यरत आहेत. दरम्यान चांद्रयान ३ चे यशस्वी मोहिमेत नांदेडची कन्या तनुजा यांनी देखील योगदान देऊन नांदेडचे उंचावले आहे. सोशल मीडियावर तनुजा पत्की (देशपांडे) यांच सर्वत्र कौतुक होतं आहे. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी चंद्रयान ३ मोहिमेत सहभागी असलेल्या तनुजा पत्की यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधून त्यांचे कौतुक केले. तनुजा पत्की बंगळुरू येथे इस्रोसाठी कार्यरत आहेत. चव्हाण यांनी आज पत्की यांचे बंधू डॉ. राजस देशपांडे यांना दूरध्वनी केला आणि त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली. नांदेडशी जुना बंध असलेली एक कन्या भारताच्या ऐतिहासिक चंद्रयान ३ मोहिमेत योगदान देते. ही बाब सर्व नांदेडकरांना अभिमानाची अनुभूती देणारी असल्याचे चव्हाण यांनी डॉ. देशपांडे यांना सांगितले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/LF4g8Bf
No comments:
Post a Comment