भोपाळ: पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं केल्याची घटना मध्य प्रदेशच्या दमोह जिल्ह्यात उघडकीस आली आहे. महिलेनं तिच्या प्रियकराची ओळख मानलेला भाऊ म्हणून करुन दिली होती. विवाहबाह्य संबंधात पती अडसर ठरु लागल्यानं तिनं प्रियकराच्या मदतीनं त्याचा काटा काढला. प्रियकराच्या साथीदारांनी मृतदेह नदीत फेकून दिला. कोणालाही शंका येऊ नये म्हणून महिला आणि तिचा प्रियकर पोलीस आणि सासऱ्यांसोबत मृतदेह शोधण्याचं नाटक करत होते.पोलिसांनी प्रकरणाचा तपास हाती घेतला. त्यांनी सर्वप्रथम कॉल डिटेल्स काढले. पन्नामध्ये राहणारी कविताचं (२३)लग्न दीपचंद पटेल (२६) सोबत झालं होतं. लग्नाआधी कविताचं घरात भाड्यानं राहणाऱ्या कल्लू उर्फ ब्रजेश बर्मन (२१) नावाच्या तरुणाशी अफेअर होतं. दोघांचं जात वेगळी असल्यानं कुटुंबाचा लग्नाला विरोध होता. त्यामुळे दोघांचा विवाह होऊ शकला नाही. कविताच्या आई, वडिलांनी तिचा विवाह दमोहमध्ये राहणाऱ्या दीपचंद पटेलशी केला.लग्नानंतर सर्वकाही व्यवस्थित सुरू होतं. कविताचे सासरे तिला लेक मानायचे. कारण कित्येक वर्षांनी त्यांच्या घरात बाईमाणूस आलं होतं. कविता तिच्या प्रियकराला विसरली होती. कविताचा पती दीपचंद राजस्थानात सिमेंट कारखान्यात काम करत होता. लग्नानंतर काही दिवसांनी दीपचंद नोकरीसाठी निघून गेला. कविता घरी एकटीच असायची. एक दिवस मोबाईलमधील कॉन्टॅक्ट लिस्ट पाहताना तिला कल्लूचा नंबर दिसला. तिला जुने दिवस आठवले. तिनं एक दिवस कल्लूला कॉल केला. कल्लूनं कविताची विचारपूस केली. त्याच्याही मनात जुन्या आठवणी ताज्या झाल्या. यानंतर २२ जुलैला या कहाणीला वेगळं वळण लागलं. ५५ वर्षांचे हाकम पटेल यांनी पोलीस ठाण्यात स्वत:चा मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. एकुलता एक लेक असलेला दीपचंद १९ जुलैला घरातून निघाला. पण परतलाच नाही, अशी तक्रार पटेल यांनी नोंदवली.दीपचंद बेपत्ता असल्याची बातमी त्याच्या सासरी पोहोचली. सासरचे लोक दमोहला पोहोचले. हाकम यांच्यासोबत त्यांनी जावयाचा शोध सुरू केला. लेक आणि सुनेत कोणताच वाद नव्हता, अशी माहिती हाकम यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी दीपचंदचा सीडीआर काढला. दीपचंदचा शेवटचा कॉल पन्नाच्या लोहरामध्ये राहणाऱ्या कल्लूसोबत झाल्याचं सीडीआरमधून समोर आलं.यानंतर पोलिसांनी कल्लू बर्मनच्या मोबाईल नंबरचा सीडीआर काढला. तो गणेश विश्वकर्मा नावाच्या व्यक्तीच्या सातत्यानं संपर्कात असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. यानंतर पोलिसांनी दीपचंद, कल्लू आणि गणेश यांच्या मोबाईल नंबरचं लोकेशन तपासलं. १९ जुलैला तिघे खैरा गावात होते. दीपचंदचा फोन वर्धा गावाजवळ स्विच्ड ऑफ झाला. याच ठिकाणी गणेश आणि कल्लूचे मोबाईलही बंद झाले. त्यावरुन पोलिसांना संशय आला.कल्लूच्या सीडीआरमध्ये कविताचाही नंबर मिळाला. १९ जुलैला दोघांमध्ये संवाद झाला होता. याआधी दोघांमध्ये अनेकदा बातचीत झाली होती. पोलिसांनी कल्लू आणि गणेशला ताब्यात घेत विचारपूस केली. कविताच्या माहेरच्या घरात भाड्यानं राहायचो. त्यामुळे तिला ओळखतो, असं म्हणत कल्लूनं पोलिसांची दिशाभूल केली. यानंतर पोलिसांनी कल्लूची कसून चौकशी केली. कवितानं सगळं काही सांगितलंय. आता तुझी पाळी आहे. खरं काय ते बोल, असं खोटी बतावणी पोलिसांनी केली. यानंतर कल्लूनं खुनाची कबुली दिली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/tC5kvhU
No comments:
Post a Comment