इंदापूर: क्षुल्लक कारणावरून ठेकेदारावर तर पूर्व वैमनस्यातून माजी नगरसेवकावर केल्याचा प्रकार जिल्ह्यातील इंदापुरात घडला. या घटनेमुळे इंदापुरात खळबळ उडाली आहे. सुधीर किसन पारेकर (वय ३० वर्ष रा.पारेकर वस्ती वनगळी ता. इंदापूर), राजेश हरिदास शिंदे (वय ५४ वर्ष रा. सावतामाळीनगर इंदापूर) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.मिळालेल्या माहितीनुसार सुधीर पारेकर हे इंदापूर नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे ठेकेदार म्हणून काम करतात. तर राजेश शिंदे हे इंदापूर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक आहेत. पारेकर हे येथील बावडा वेस नाक्या लगतच्या भागात डास निर्मूलनासाठी धुरळनीचे काम करून घेत होते. यावेळी आरोपीने ठेकेदार पारेकर यांच्याकडे धुरळनी यंत्राची मागणी केली. मात्र धुरळनीचे यंत्र गरम झाल्याने ते देण्यास त्यांनी नकार दिला. त्यामुळे आरोपीने चिडून पारेकर यांच्यावर कोयत्याने हल्ला चढविला.त्यानंतर याच भागातील माजी नगरसेवक राजेश शिंदे यांनी आरोपीच्या आरोपीच्या वडिलांना शिवीगाळ केली होती. याचा राग धरून आरोपीने शिंदे यांच्यावरही कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात पारेकर यांच्या कपाळावर गंभीर दुखापत झाली आहे. तर शिंदे यांच्या दंडावर व हातावर जखम झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी गेले असता त्याची पोलिसांशीही शाब्दिक चकमक झाल्याचे समजते. सदर प्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे काम चालू आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/hUFqpPu
No comments:
Post a Comment