Breaking

Sunday, August 27, 2023

साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचं फेसबुक पेज हॅक,हॅकर विरोधात पोलिसांत तक्रार दाखल https://ift.tt/X6zRYcL

सातारा : सातारा- जावली मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे फेसबुकवरील Chh.ShivendraRaje Bhonsle हे अधिकृत फेसबुक पेज अज्ञात हॅकरने हॅक केले आहे. याबाबत सातारा पोलिसांच्या सायबर सेलकडे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून रीतसर तक्रार करण्यात आली आहे. संबंधित हॅकरवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.४३ हजार फॉलोअर्स असलेल्या शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या फेसबुक पेजवर दररोज पोस्टिंग होत असतं. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या चालू घडामोडी, कार्यक्रम प्रसिद्ध केल्या जातात. मात्र, गेल्या तीन- चार दिवसापासून ऍडमिनचा अक्सेस काढून घेतल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पेजवर सर्च केल्यानंतर सदरचे पेज हॅक केल्याचे स्पष्ट झाले, असल्याचं पोलिसांना दिलेल्या पत्रात म्हटलं आहे. याबाबतची रीतसर तक्रार सातारा सायबर सेलकडे करण्यात आली आहे. सदर पेजवर कोणतीही अनधिकृत पोस्ट पडल्यास त्यास सबंधित हॅकर जबाबदार असेल. तसेच अनधिकृत पोस्ट पडल्यास आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कार्यकर्ते, प्रेमी, फॅन्स, नागरिकांनी त्यावर कसलीही प्रतिक्रिया देऊ नये, असे आवाहन शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून हॅकर्सची नजर सातारा सारख्या शांतताप्रिय जिल्ह्यावर पडल्याचं दिसून येत आहे. सायबर हल्ल्यांपासून वाचण्यासाठी नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचं आवाहन देखील पोलिसांकडून वारंवार करण्यात येत असतं. दरम्यान, सातारा पोलिसांकडून सायबर गुन्हेगारांवर काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सायबर गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळं नागरिकांनी अनोळखी व्यक्तींनी बँक खाते, किंवा सोशल मीडिया खात्यांसदर्भात काही माहिती मागितल्यास देऊ नये. कोणत्याही अनोळखी व्यक्तीनं फोन करुन ओटीपी मागितल्यास तो देखील देऊ नये. याशिवाय गेल्या काही दिवसांपासून विजेचे बील थकलं असल्याचा फोन करुन अनेकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात असल्याची प्रकरण देखील अनेकदा समोर आलेली आहेत. त्यामुळं नागरिकांनी सोशल मीडिया असो की अनोळखी व्यक्ती असो सावधगिरी आणि सतर्कता बाळगणं महत्त्वाचं आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/4H97tsI

No comments:

Post a Comment