Breaking

Monday, August 28, 2023

Monsoon 2023: राज्यात पावसाचा लपंडाव; अनेक जिल्ह्यांत भीषण पाणीटंचाई, सतराशे वाड्या-गावांमध्ये टँकर https://ift.tt/hILMrRo

मुंबई : राज्यात सध्या पावसाच्या सुरू असलेल्या लपंडावामुळे अनेक जिल्ह्यांत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. परिणामी अनेक गावांना आणि वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या कैक पटीने अधिक असल्याने ऑगस्टमध्येच दुष्काळाचे भीषण वास्तव समोर आले आहे. राज्यात एकूण १,४०३ वाड्यांना; तर ३६३ गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याची धक्कादायक माहिती एका अहवालाच्या माध्यमातून समोर आली आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी याच दिवशी हे प्रमाण १९ वाड्या आणि १० गावे इतकेच होते.दरम्यान, राज्यात सध्याच्या घडीला ३८६ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू असून, त्यात ४८ सरकारी आणि ३३८ खासगी टँकरचा समावेश आहे. राज्यात अनेक ठिकाणी पावसाने दडी मारल्याने पाण्याची स्थिती गंभीर बनली आहे. काही ठिकाणी दृष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत पीकपेरणी अहवालाच्या माध्यमातून राज्यातील पावसाचे आणि पेरणीचे वास्तव समोर आले होते. त्यानंतर आता राज्यातील पाणीटंचाईदेखील वाढल्याने राज्य सरकारसमोर नवे आव्हान उभे ठाकले असून, राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. या संदर्भातील एक सविस्तर अहवाल नुकताच मुख्यमंत्री कार्यालयासह पाणीपुरवठामंत्र्यांच्या कार्यालयात सादर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.या अहवालानुसार राज्यातील सातारा जिल्ह्यात सर्वाधिक ४०० वाड्यांना आणि ७८ गावांना सध्या टँकरने पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती हाती आली आहे. त्यापाठोपाठ नगर येथील ३७९ वाड्यांना आणि ६६ गावांना; तर पुण्यातील २७४ वाड्यांना आणि ३४ गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्याशिवाय सांगलीतील १७६ वाड्या आणि २९ गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याचे या अहवालात नमूद केले आहे. सध्या पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांतील सर्वाधिक म्हणजे ९४० वाड्यांना आणि १५२ गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.आठवडाभरात प्रमाण वाढलेराज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रमाण वाढले असल्याची माहिती पुढे आली असतानाच, मागील आठवड्याच्या तुलनेतही टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रमाण वाढले असल्याची माहिती या अहवालातून समोर आली आहे. गेल्या आठवड्यात राज्यातील एकूण १,३१९ वाड्यांना, तर ३५० गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. यात ४९ शासकीय; तर ३२० खासगी अशा एकूण ३६९ टँकरचा समावेश होता.टँकरने पाणीपुरवठा होत असलेली ठिकाणेजिल्हा गावे वाड्या सरकारी टँकर खासगी टँकर एकूणनाशिक ७५ ६२ ६ ५४ ६०अहमदनगर ६६ ३७९ १२ ४८ ६०पुणे ३४ २७४ ५ ३५ ४०सातारा ७८ ४०० ९ ७४ ८३सांगली २९ १७६ ७ २७ ३४सोलापूर ११ ९० ० १० १०औरंगाबाद ३० ४ ० ४१ ४१जालना २३ १८ ३ ३६ ३९जळगाव १३ ० ६ ९ १५बुलढाणा ४ ० ० ४ ४ एकूण ३६३ १४०३ ४८ ३३८ ३८६(ही आकडेवारी २८ ऑगस्ट २०२३ पर्यंतची आहे.)


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/X5Qa8bW

No comments:

Post a Comment