Breaking

Monday, August 28, 2023

शिर्डी लोकसभेवरुन घोलपांचे नाराजीनाट्य; वाकचौरेंच्या उमेदवारीला विरोध, ठाकरेंसमोर पेच https://ift.tt/V7yCQ4W

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक:शिर्डीमध्ये लोकसभा मतदारसंघात उमेदवारी देण्यावरून उद्धव ठाकरेंसमोर पेच निर्माण झाला असून, माजी खासदार विरुद्ध माजी मंत्री यांच्यात जुंपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाऊसाहेब वाकचौरे यांना यांच्याकडून उमेदवारी घोषित होताच माजी मंत्री बबनराव घोलप यांची 'मातोश्री'वर धाव घेत त्यांच्या उमेदवारीला विरोध केल्याने ठाकरे गटात नाराजीची ठिणगी पडली आहे.शिवसेनेतील फुटीनंतर महिनाभरानंतर उद्धव ठाकरे यांची साथ सोडत १२ खासदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले. त्यांच्यामध्ये शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांचादेखील समावेश होता. त्यामुळे राज्यातील लोकसभांसाठी उद्धव ठाकरेंकडून सध्या लोकसभानिहाय जागांचा आढावा घेतला जात आहे. नाशिकसह शिर्डीची जागा परत मिळवण्यासाठी ठाकरेंनी शिर्डीतून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी देण्याची तयारी सुरू केली आहे. परंतु, शिर्डीच्या जागेवर लढण्यासाठी माजी मंत्री बबनराव घोलप यांनीही तयारी सुरू केली आहे. त्यामुळे ठाकरेंकडून वाकचौरेंना बळ दिले जात असतानाच घोलप यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेत वाकचौरेंच्या उमेदवारीला विरोध केला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. वाघचौरेंना उमेदवारी देण्यावरून घोलप यांनी ठाकरेंकडे नाराजी व्यक्त केल्याचे समजते. शिर्डीच्या जागेवरून घोलप अस्वस्थ झाल्याने ठाकरे या स्थितीवर मार्ग काढत शिर्डीची जागा कशी मिळवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.उमेदवारीचे दिले होते आश्वासनशिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरेंकडून पाच वेळा आमदार राहिलेल्या बबनराव घोलप यांना लोकसभेच्या उमेदवारीचे आश्वासन देण्यात आले होते. घोलप यांना मतदारसंघात संपर्कप्रमुख नेमून नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याच्या सूचना ठाकरे यांनी दिल्या होत्या. मात्र, अशातच ठाकरे यांनी जुन्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन वाकचौरे यांच्या उमेदवारीवर परस्पर शिक्कामोर्तब केल्याने घोलप अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे घोलपांच्या नाराजीवर काय तोडगा काढतात याकडे पदाधिकारी, शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/DjKULb6

No comments:

Post a Comment