Breaking

Tuesday, August 29, 2023

Mumbai News: पुढील आठवड्यात सर्व खड्डे बुजवा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश https://ift.tt/auojSgE

मुंबई : ‘यंदाच्या गणेशोत्सवात गणेशमूर्तींचे आगमन आणि विसर्जन सुरळीत व्हावे, यासाठी आगमन-विसर्जन मार्गांचा आढावा घ्या. तसेच त्या मार्गांवर खड्डे आढळून आल्यास पुढील आठवड्याच्या आत ते बुजवा,’ असे निर्देश मुंबई महापालिका आयुक्त आणि प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी अधिकाऱ्यांना दिले.यंदा १९ ते २८ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव साजरा होणार आहे. दरवर्षी पावसाळ्यात मुंबईकरांना खड्ड्यांच्या समस्येला तोंड द्यावे लागते. ही परंपरा महापालिकेने यंदाही राखली आहे. उलट यात, रस्त्यांची डागडुजी केल्यानंतर होणाऱ्या असमतोल रस्त्यांच्या समस्येचीही भर घातली आहे. त्यामुळे गणपती आगमन-विसर्जनावेळी याचा त्रास गणेशमंडळांना होऊ शकतो, अशी कुजबूज मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.मुंबईत १५ ऑगस्टपासून मोठ्या सार्वजनिक गणेशोत्वस मंडळांच्या गणपतीमूर्तींच्या आगमनाला सुरुवात झाली आहे. आगामी ३ सप्टेंबरला रविवार असून, त्या दिवशी मोठ्या मंडळांच्या ११ गणेशमूर्ती, ९ सप्टेंबरला आठ, तर १० सप्टेंबरला २७ मोठ्या गणेशमंडळांच्या मूर्तींचे आगमन होणार आहे. ही संख्या पुढे आणखी वाढत जाईल. त्यामुळे त्यापूर्वीच रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे.या सर्व पार्श्वभूमीवर गणेशमूर्ती आगमन-विसर्जन मार्गांचा आढावा पालिका आयुक्तांनी घेतला. यावेळी खड्डे बुजवणे, आवश्यक ठिकाणी डागडुजी करणे, गणेश मंडळांच्या परिसरात स्वच्छता राखणे, विसर्जनाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा व्यवस्था राखणे, गणेशोत्सव मंडळांना आवश्यक परवानग्या देणे आदी आवश्यक उपाययोजना करण्यासंदर्भात चहल यांनी मध्यवर्ती यंत्रणांसह परिमंडळीय सहआयुक्त, उप आयुक्त, २४ विभागांचे सहायक आयुक्त तसेच संबंधित यंत्रणांना आदेश दिले.तसेच या कार्यवाहीचा अहवाल उप आयुक्त (पायाभूत सुविधा) हे नियमित घेतील आणि सहआयुक्त (महापालिका आयुक्त कार्यालय) यांना सादर करतील. खड्डेमुक्त रस्त्यांचे उद्दिष्ट साध्य करत असताना, काही समस्या किंवा अडचणी उद्भवल्यास पुढील दोन दिवसांत त्या तातडीने अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांना कळविणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/XtHBx9N

No comments:

Post a Comment